
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हुब्बळ्ळी येथे मंदिर स्वच्छता, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना, धार्मिक, तसेच आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन, साधना प्रवचन इत्यादी उपक्रम घेण्यात आले. त्याचप्रमाणे विविध संप्रदाय आणि सांस्कृतिक संघटनांच्या सहभागासह ‘हिंदू एकता दिंडी’ पार पडली. ही दिंडी हुब्बळ्ळीच्या मुरुसावीर मठाच्या येथून प्रारंभ होऊन शहरातील मुख्य मार्गावरून जाऊन तिचा समारोप पुन्हा मुरुसावीर मठाकडे करण्यात आला. या वेळी धर्मध्वज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतिमेची पूजा धर्मप्रेमी श्री. दयानंद राव यांनी केली. त्यानंतर सहना भट्ट आणि त्यांच्या गटाने भरतनाट्यमच्या माध्यमातून सेवा अर्पण केली.


या दिंडीमध्ये कर्नाटक संस्कृती विभागाचे ढोल पथक, शहनाई वादक पथक, के.एस्.एस्. महाविद्यालयाचे ४८ विद्यार्थी कलश (कुंभ) घेतलेले, ‘विजयलक्ष्मी’ टिपर्यांचे पथक, ‘हरे कृष्ण भजन मंडळा’चे भजन पथक, वारकरी महिला मंडळ, अन्य महिला संघाच्या कार्यकर्त्या, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक असे एकूण ७०० हून अधिक जण सहभागी झाले होते. दिंडीच्या समारोपाच्या वेळी कर्नाटक उच्च न्यायालयातील अधिवक्ते नारायण याजी, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. शरत कुमार आणि सनातन संस्थेच्या सौ. विदुला हळदीपूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मंगळुरू येथे हिंदू एकता दिंडी

मंगळुरू – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त येथील पी.व्ही.एस्. वर्तुळ येथे धर्मध्वजाच्या पूजेसह प्रारंभ झालेल्या शोभायात्रेची सांगता लालबाग येथे झाली. या दिंडीमध्ये सनातन संस्थेचे पू. विनायक कर्वे, पू. (श्रीमती) राधा प्रभु आणि सनातनचे पहिले बालकसंत पू. भार्गवराम प्रभु यांची वंदनीय उपस्थिती लाभली. समारोपाच्या वेळी धर्मप्रेमी अधिवक्ता उदयकुमार बी.के., हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुप्रसाद गौडा आणि सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै यांनी मार्गदर्शन केले.


वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१. दिंडी जात असतांना आकाशात गरुड प्रदक्षिणा घालत असल्याचे अनेक साधकांनी पाहिले.
२. दिंडीमध्ये सहभागी झालेले घोषणा देत असतांना रस्त्यावरून जाणार्या बसेस मधील लोक हिंदु राष्ट्रविषयक जयघोष करत होते.