शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांना नम्र विनंती !
१. वार्षिक स्नेहसंमेलन आणि अन्य स्पर्धा यांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके देऊन गौरवले जाणे
प्रतिवर्षी डिसेंबर आणि जानेवारी या मासांत सर्व शाळा अन् महाविद्यालये यांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी त्यांचे कौशल्य आणि आवड यांनुसार गायन, नृत्य, नाट्य, एकांकिका आदी सादर करतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या सादरीकरणानुसार विविध पारितोषिके दिली जातात. त्याचप्रमाणे वर्षभरातही शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये वक्तृत्व, गायन, वादन, मैदानी खेळ आदी निरनिराळ्या स्पर्धा होत असतात. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी विविध पारितोषिके देऊन गौरवले जाते.
२. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची नावे
विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून सनातनने प्रसिद्ध केलेले ‘बालसंस्कार’ या ग्रंथमालिकेतील, तसेच अन्य ग्रंथ दिल्यास त्यांच्या मनावर सुसंस्कारांचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य होईल. ‘व्यावहारिक जीवनात यशस्वी बनण्यासह गुणी अन् आदर्श होण्यासाठी काय करावे ?’, याविषयीची अमूल्य माहिती या ग्रंथांत दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी ती मार्गदर्शक ठरेल.
बाजूला दिलेल्या ग्रंथांची मागणी स्थानिक साधक किंवा नियतकालिकांचे वितरक यांच्याकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर करावी. सनातनने प्रकाशित केलेल्या अन्य ग्रंथांविषयी जाणून घेण्यासाठी sanatanshop.com हे संकेतस्थळ पहावे.
ज्या भाषेमध्ये ग्रंथ उपलब्ध आहे, त्या पुढील भाषेच्या रकान्यात √ अशी खूण केली आहे.
साधकांसाठी सूचना !
विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ पारितोषिक म्हणून देण्यासाठी मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना संपर्क करा !
सर्वत्रच्या साधकांनी जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांना भेटून ग्रंथांविषयीची माहिती सांगावी. विद्यार्थ्यांना ‘संस्कार’, राष्ट्र यांविषयीचे आणि अन्य ग्रंथ पारितोषिक म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.
शालेय किंवा महाविद्यालयीन वर्षाच्या आरंभीच विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ पारितोषिक म्हणून देण्याविषयीचे विनंतीपत्र मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना देण्याचे नियोजन करावे.