सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सव निमित्त जळगावच्‍या हिंदु एकता दिंडीत भक्‍ती आणि शौर्य यांचा संगम !

जळगाव – सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने २७ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता शहरात ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले होते. या दिंडीत ८०० हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्‍ट्र आणि धर्म प्रेमी नागरिक सहभागी झाले. दिंडीत भगवेधारी महिला, पुरुष, शंख, तुतारी, नाद, टाळ-मृदुंगाचा गजर, तसेच लाठी-काठी, दंडसाखळी, दांडपट्टा यांची शौर्य जागृतीपर प्रात्‍यक्षिके सादर करण्‍यात आली. भक्‍ती आणि शौर्य यांचा संगम दिंडीत दिसून आला.

इस्‍कॉन संप्रदायाचे श्री. शंकरशन देवदास महाराज, सनातनचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांच्‍या शुभहस्‍ते धर्मध्‍वज पूजन करत नेहरू चौक येथून दिंडीला प्रारंभ झाला. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या पालखीचे पूजन अधिवक्‍ता श्री. भरत देशमुख यांच्‍या हस्‍ते, श्रीरामाच्‍या पालखीचे पूजन योग वेदांत सेवा समितीचे श्री. अनिल चौधरी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. पौरोहित्‍य श्री. भूषण मुळ्‍ये यांनी केले. शिवतीर्थ मैदान येथे दिंडीचा समारोप झाला.

 

मान्‍यवरांचे अभिप्राय

१. श्री. सुरेश भोळे, भाजप आमदार, जळगाव – हिंदु नागरिक, संघटना, संप्रदाय यांना संघटित करण्‍याचे महत्‍कार्य गुरुदेव डॉ. आठवले करत आहे. यामुळे हिंदु राष्‍ट्र निर्माण होणार, यात शंकाच नाही.

२. अधिवक्‍ता भरत देशमुख, माजी अध्‍यक्ष, महाराष्‍ट्र – गोवा बार असोसिएशन – हिंदु एकता दिंडीमुळे आनंद मिळाला. सर्व संप्रदाय एकत्र आल्‍यामुळे उत्‍साह संचारला.

३. श्री. अनिल जोशी, जनसंपर्क अधिकारी, जैन इरीगेशन, जळगाव – दिंडीत सर्वांग एकतेचे दर्शन झाले. शोभयात्रा आदरणीय अशीच आहे.

४. डॉ. नीलेश चांडक, कॅन्‍सर हॉस्‍पिटल, जळगाव – अप्रतिम दिंडी ! स्‍त्री शक्‍तीचा सहभाग उल्लेखनीय, अतिशय शिस्‍तबद्ध आणि भावपूर्ण अशी दिंडी होती. नियोजन पुष्‍कळ चांगले होते.

पथक

दिंडीत संत, क्रांतीवीर आणि राष्‍ट्रपुरुष यांच्‍या वेशभूषा केलेल्‍या आणि प्रभावी संदेश देणार्‍या बालकांचे पथक, छत्रपती शिवाजी महाराज आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा केलेले अश्‍वपथक, विठ्ठल-रुक्‍मिणी यांची मूर्ती असलेला अश्‍व, मशालधारी, गदाधारी मावळे, शंखनाद पथक, श्रीशिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे धारकरी, स्‍वसंरक्षण प्रात्‍यक्षिक पथक, ढोल पथक, श्रीराम रथ, वारकरी पथक, कलश, तुळसधारी महिला पथक, ध्‍वज पथक, आपत्‍कालीन पथक, प्रथमोपचार पथक, शिरसोली येथील लेझीम पथक, शिरसोली, लाडली येथील वारकरी पथक, छत्री पथक, योग वेदांत समिती रथ, वीर सावरकर रथ, टाळ नृत्‍य पथक, रणरागिणी पथक

पूजन

फेरीच्‍या मार्गात शास्‍त्री चौक येथे मुंबई वडापावचे श्री. कृष्‍णा कोळी, चित्रा चौकात शिवपंचायतन देवस्‍थान समिती, गोलाणी मार्केट हनुमान मंदिर येथे श्री. मंडीराम सोनी आणि श्री. श्‍याम कोगटा, कोर्ट चौक येथे श्री. मनोहर चौधरी यांच्‍या वतीने पूजन करण्‍यात आले.

सहभागी संघटना

इस्‍कॉन, योग वेदांत सेवा समिती, जय गुरुदेव, चैतन्‍य बापू संप्रदाय, वारकरी संप्रदाय, श्रीमंत शिवतेज प्रतिष्‍ठान, हिंदु राष्‍ट्र सेना, शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान, शिवप्रतिष्‍ठान युवा हिंदुस्‍तान, सनातन संस्‍था, हिंदु जनजागृती समिती

Leave a Comment