चंडी यागाद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’ची (८१ व्या जन्मोत्सवाची) सांगता !
रामनाथी (फोंडा), गोवा – सनातनच्या रामनाथी, फोंडा, गोवा येथील आश्रमात १४ आणि १५ मे या दिवशी झालेल्या चंडी यागाद्वारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाची अर्थात् ‘ब्रह्मोत्सवा’ची सांगता झाली. ११ मे या दिवशी फर्मागुडी, फोंडा, गोवा येथे झालेल्या दिव्य ब्रह्मोत्सवापासून या सोहळ्याला आरंभ झाला होता.
यागातील आहुती !
यागात पायसाची (दुधात शिजवलेला भात, तसेच रक्तचंदन, पळसाची फुले आदी १० घटक मिळून पायस बनवला जातो) आहुती देण्यात आली. यासह ठराविक वेळी विडा, सुपारी आणि केळी, तसेच कोहळा, बेलफळ आदी फळे यागात अर्पण करण्यात आली.
असा झाला चंडीयाग !
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार ब्रह्मोत्सव सोहळ्यानंतर १४ आणि १५ मे या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी चंडी याग करण्यात आला. या यागात सप्तशतीचे पाठ करत आहुती देण्यात आली. या यागाचे पौरोहित्य सनातनचे पुरोहित साधक श्री. अमर जोशी, श्री. सिद्धेश करंदीकर आणि श्री. ईशान जोशी यांनी केले. या प्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ याही उपस्थित होत्या.
पूजेची मांडणी !
ब्रह्मादि मंडल देवता, वरूण कलश आणि स्फटिकाचे श्रीयंत्र अशी पूजेची मांडणी करण्यात आली होती.