ढवळी (फोंडा, गोवा) – येणार्या आपत्काळाच्या अनुषंगाने बिकट परिस्थितीला सक्षमपणे तोंड देता येण्यासाठी साधकांनी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांसह शारीरिक स्तरावरही सिद्ध होणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने येथे सनातनच्या साधकांसाठी तीन दिवसीय बिंदुदाबन शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या वेळी सनातनचे साधक आणि निसर्गाेचपारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले. या प्रसंगी काही रुग्ण साधकही शिबिरात सहभागी झाले होते. बिंदुदाबनासह निसर्गाेपचाराच्या काही उपचारपद्धती यांमुळे रुग्ण साधकांना बरे वाटल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
१. शिबिरात एकूण २० साधक सहभागी झाले होते, तर पोट आणि मणका यांच्याशी संबंधित आजार असणार्या २७ रुग्ण साधकांवर उपचार करण्यात आले.
२. अन्यांवर बिंदुदाबनाद्वारे कशा प्रकारे उपचार केले पाहिजे ?, हे शिबिरार्थिंनी अत्यंत जिज्ञासेने जाणून घेतले. शिबिराच्या प्रात्यक्षिकांतही सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
३. मनोगत व्यक्त करतांना अनेक शिबिरार्थिंनी बिंदुदाबन शिकतांना आनंदाची अनुभूती येत असल्याविषयी आणि उत्साह वाढल्याविषयी सांगितले. यासह बिंदुदाबन करण्यातील त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
४. शिबिराला सनातनच्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
बिंदुदाबनाचे अनन्यसाधारण महत्त्व !
काणकोण येथील सनातनच्या साधिका सुधा देसाई यांचे दोन्ही गुडघे दुखत असत. त्यांना चालताही येत नसे. आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) त्यांच्या गुडघ्यांची शस्त्रक्रिया करायला सांगितली होती. शिबिरामध्ये उपचार केल्यानंतर त्यांना चालता येऊ लागले. यातून उपस्थित सर्वांना बिंदुदाबनाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आले.