सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त…

भाग्यनगर – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने येथे भव्य ‘सनातन एकता शोभायात्रा’ काढण्यात आली. महाराष्ट्र मंडळाच्या ढोलपथकाच्या वाद्यगजरात निघालेल्या या शोभायात्रेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी सनातन एकता मंच, बजरंग सेना, हिंदू संघटन एकता मंच, सनातन हिंदू संघ, हिंदू टू हिंदू, हिंदु वाहिनी, जय श्रीराम सेना, आर्य वैश्य समाज, भावसार क्षत्रिय समाज, हिंदू महासभा, अखिल भारत गौ सेवा फाऊंडेशन, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

धर्मध्वज, गोमाता आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्याम बाबा मंदिरापासून चैतन्यमय वातावरणात शोभायात्रेला प्रारंभ होऊन सावरकर चौकामध्ये शोभायात्रेचे रूपांतर सभेत झाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचा संकल्प करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

क्षणचित्रे
१. या शोभायात्रेमध्ये लहान मुले धार्मिक वेशभूषेत सहभागी झाली होती.
२. आर्य वैश्य समाजाच्या महिलांनी दांडिया सादर केला.