सनातनने आतापर्यंत गुरुकृपायोगाच्या अंतर्गत विविध साधनामार्गांची ओळख करून देणारे ग्रंथ प्रकाशित केले आहेत, तसेच ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातूनही वाचकांना त्यांची ओळख करून दिली आहे. आगामी काळात अध्यात्म आणि विविध साधनामार्ग यांची अधिक सविस्तर माहिती जिज्ञासूंना देता यावी, यासाठी त्या संदर्भातील लिखाणाचे संकलन करणे चालू आहे. यासंदर्भात लेख असणारे दैनिक, पाक्षिक, मासिक यांसारखी नियतकालिके कुणाकडे असल्यास त्यांनी पुढील प्रमाणे प्रक्रिया करावी.
नियतकालिके पाठवतांना पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.
१. ही नियतकालिके मुद्दामहून खरेदी करून पाठवू नयेत.
२. नियतकालिके पाठवण्यापूर्वी ती सनातनकडे उपलब्ध आहेत का ? याची निश्चिती करण्यासाठी पुढे उल्लेख केलेल्या इमेल पत्त्यावर नियतकालिकांची यादी पाठवावी. यादी पाठवतांना नियतकालिकाचे नाव, प्रकाशनाचा दिनांक, पाठवणार्याचे नाव आणि संपर्क क्रमांक यांचा उल्लेख करावा. संबंधित साधकांनी त्यासंदर्भात परत निरोप दिल्यावरच ती नियतकालिके गोवा येथील मुख्य कार्यालयात पाठवावीत.
३. ही नियतकालिके शक्यतो मराठी अथवा हिंदी भाषेतील असावीत.
४. साधकांना नियतकालिकांचा संग्रह वैयक्तिक संदर्भासाठी ठेवायचा असल्यास संबंधित लेखांची पाठपोठ छायांकित प्रत (झेरॉक्स) काढून पाठवावी. लेखासमवेत त्या नियतकालिकाचा प्रकाशक, मुद्रक यांचा उल्लेख असणार्या पानाचीही छायांकित प्रत जोडावी.
५. ही नियतकालिके मुद्दामहून खर्च करून पोस्टाने पाठवू नये. आपल्या भागातून कुणी साधक गोवा येथे येत असल्यास त्यांच्या मार्फत किंवा सनातनच्या जवळील सेवाकेंद्रात जमा करावीत.
साधकाचे नाव आणि इमेल पत्ता – श्री. अमोल बधाले, sankalak.goa@gmail.com