कोल्हापूर – तुम्ही जे हिंदु राष्ट्राचे कार्य करत आहात, ती काळाची आवश्यकता असून त्याला यश प्राप्त होईल. हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्या सनातन संस्थेसारख्या अनेक संस्थांची आवश्यकता असून यापुढील काळात हे कार्य वृद्धींगत होईल. ही वास्तू (सनातनचे सेवाकेंद्र) नामजपाने पवित्र झालेली आहे, असे आशीर्वचन पू. कृष्णात डोणे महाराज (वाघापुरे महाराज) यांनी दिले. संत बाळूमामा देवस्थान, आदमापूर येथे भाकणूक करणारे पू. कृष्णात डोणे महाराज (वाघापुरे महाराज) यांनी सनातन संस्थेच्या शाहूपुरी येथील सेवाकेंद्रास २९ एप्रिलला सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी त्यांनी हे आशीवर्चन दिले.
या प्रसंगी सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांनी पू. कृष्णात डोणे महाराज (वाघापुरे महाराज) यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला.
पू. कृष्णात डोणे महाराज (वाघापुरे महाराज) यांनी सेवाकेंद्रातील ध्यानमंदिर पाहिले, तसेच तेथे भंडार्याची उधळण केली.
पू. कृष्णात बाबूराव डोणे महाराज (वाघापुरे महाराज) यांनी सनातन संस्थेच्या कार्यासाठी आशीर्वादही दिले.
या प्रसंगी महाराजांचे भक्त श्री. भरत गुरव, श्री. सूरज कदम, श्री. संग्राम तोरस्कर, डॉ. शिवदान गोरे यांच्यासह अन्यही उपस्थित होते.