१. डॉ. सुनीलकुमार चौहान, कांगरा, हिमाचल प्रदेश.
अ. ‘आश्रम पुष्कळ छान, म्हणजे उत्कृष्ट आहे. येथे मला मिळालेला आंतरिक आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.’
आ. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेले अभिप्राय ! – ‘हे प्रदर्शन पाहिल्यावर मला एक वेगळा दृष्टीकोन मिळाला. सूक्ष्म शक्तींचा स्थूल गोष्टींवर झालेला परिणाम पहाणे आश्चर्यकारक होते. वैदिक शास्त्र शिकवण्यासाठी वैज्ञानिक परिमाणांचा उपयोग करून मिळवलेले हे ज्ञान समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचवायला हवे. एक उत्तम मार्ग दाखवल्याबद्दल मी संयोजक आणि संत यांना नमन करतो.’
२. श्री. हनुमंत सूर्याजी चौगले (तबलावादक), सिरसे, राधानगरी, कोल्हापूर.
अ. ‘मी आश्रमात प्रथमच आलो आहे. मला आश्रमातील सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आला. माझ्यातील नकारात्मक विचार आणि स्पंदने काही प्रमाणात शरिरातून बाहेर पडतांना जाणवली. मला माझ्या पाठीवर आणि कानात कंपने जाणवली.
आ. मी सूक्ष्म जगताविषयी पुष्कळ ऐकून होतो. आतापर्यंत मला याविषयी काही अनुभवही आले आहेत. इथे आल्यानंतर मला सूक्ष्म जगत आणि त्याचे विशाल स्वरूपातील परिणाम प्रत्यक्ष समजले.’ (२९.१.२०२३)
३. कु. विशाल सुर्वे (तबला विशारद), गोवा
अ. ‘मी आश्रमात प्रथमच आलो आहे. येथे आल्यावर मला छान वाटले. येथील परिसर छान आहे. ‘सात्त्विकता म्हणजे काय ?’, हे आज मला अनुभवायला मिळाले.’ (२९.१.२०२३)