‘१०.५.२०२४ या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे हिंदु धर्मातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे अनेक जण या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.
१. ‘सत्पात्रे दाना’चे महत्त्व !
‘सत्पात्रे दान करणे, हे प्रत्येक मनुष्याचे परम कर्तव्य आहे’, असे हिंदु धर्म सांगतो. सत्पात्रे दान म्हणजे सत्च्या कार्यार्थ दानधर्म करणे ! दान केल्याने मनुष्याचे पुण्यबळ वाढते, तर ‘सत्पात्रे दान’ केल्यामुळे पुण्यसंचयासह व्यक्तीला आध्यात्मिक लाभही होतो. अक्षय्य तृतीयेला पुढीलप्रमाणे ‘सत्पात्रे दान’ करता येईल.
२. दानाचे प्रकार
२ अ. धनदान
सध्या धर्मग्लानीचा काळ आहे. धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदु समाज अधर्माचरणी बनला आहे. योग्य धर्मशिक्षण न दिल्याने हिंदूंचा धर्माभिमान नष्ट झाला आहे. धर्माची स्थिती अशी बिकट असतांना धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य करणे, हे काळानुसार अत्यंत आवश्यक बनले आहे. त्यामुळे धर्मप्रसार करणारे संत, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाकरता कार्य करणाऱ्या संस्था किंवा संघटना यांच्या कार्यासाठी दान करणे, हे काळानुसार सर्वश्रेष्ठ दान होय. सनातन संस्था धर्मजागृतीचे हेच कार्य करत आहे. अर्पणदात्यांनी अशी संस्था किंवा संघटना यांना केलेल्या दानाचा (अर्पणाचा) विनियोग धर्माच्या पुनर्स्थापनेसाठीच होणार आहे.
२ आ. ज्ञानदान
सनातनची बहुविध आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा म्हणजे चिरंतन ज्ञानाचा अनमोल ठेवा आहे. हे ग्रंथ सहजसोप्या भाषेत वाचकांना अमूल्य ज्ञान देतात, तसेच धर्माप्रती श्रद्धाही वाढवतात. धर्माचे शाश्वत शिक्षण देणारी ही ग्रंथसंपदा म्हणजे ज्ञानदान करण्याचे सर्वाेत्तम माध्यम म्हणता येईल. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अशा ग्रंथदानाद्वारे ज्ञानदान करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही करून घ्यावा. ग्रंथदानाद्वारे अध्यात्मप्रसार करण्यासाठी हे ग्रंथ आप्तस्वकीय, शाळा-महाविद्यालये यांतील ग्रंथालये, तसेच सार्वजनिक वाचनालये यांना देता येतील. सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ खरेदी करण्यासाठी Sanatanshop.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने दान करण्यास इच्छुक असलेले अर्पणदाते पुढील लिंक वर दान करू शकतात.
https://www.sanatan.org/en/donate येथे दान (अर्पण) करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
अथवा दान करण्यास इच्छुक असलेल्या दात्यांनी स्वतःची माहिती कळवावी.
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (२६.३.२०२३)