पुरंदर (जिल्हा पुणे) येथील कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके यांची गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

सनातन प्रभात नियतकालिकांची माहिती जाणून घेतांना डावीकडून सौ. संजना मांडके, कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके आणि माहिती सांगतांना श्री. राज कर्वे

रामनाथी, गोवा – मु.पो. राख, तालुका पुरंदर (जिल्हा पुणे) येथील कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके आणि त्यांची पत्नी सौ. संजना मांडके यांनी ५ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. संदीप मांडके हे कीर्तनातून सनातनच्या ग्रंथांची माहिती सांगतात. श्री. राज कर्वे यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी माहिती दिली. ह.भ.प. संदीप मांडके आणि सौ. मांडके यांनी जिज्ञासेने कार्य जाणून घेतले. श्री. उदय बडगुजर यांनी कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके यांचा या वेळी सत्कार केला.

 

अभिप्राय

१. कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके

आश्रमात सात्त्विक अनुभूतीची परिसीमा अनुभवली, तसेच धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची तळमळ सर्व साधकांमध्ये दिसली. आश्रमातील सात्त्विक महाप्रसादाने आनंद मिळाला. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून सात्त्विक अनुभूती आल्या. गोपाळकृष्णाचे (श्रीकृष्णाचे) चित्र पाहिल्यावर ‘दुष्टच्रक घालवण्यासाठी सुदर्शनचक्र फिरत आहे आणि आता श्रीकृष्ण ते सोडण्याच्या सिद्धतेत आहे’, असे जाणवले.

२. सौ. संजना मांडके

आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. पुष्कळ नवीन गोष्टी पहायला मिळाल्या.

Leave a Comment