शीख परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

सन्मानाच्या वेळी संत कर्नल के.एस्. मजेथिया (आसंदीत बसलेले) यांना ग्रंथ अर्पण करतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

रामनाथी, १८ मार्च (वार्ता.) – शीख पंथीय गुरु गोविंदसिंग यांच्या परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांनी १६ मार्च या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे अनुयायी श्री. कुलदीप सिंग आणि त्यांची पत्नी सौ. किरण सिंग आदीही होते. सनातनचे साधक अधिवक्ता योगेश जलतारे यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र, धर्म आणि आध्यात्मिक संशोधन कार्याची माहिती दिली. संत कर्नल के.एस्. मजेथीया यांनीही जिज्ञासेने आश्रमातील कार्य जाणून घेतले.

या वेळी संत कर्नल के.एस्. मजेथिया म्हणाले, ‘‘देवाला बाहेर धुंडाळू नका. देव तुमच्या आत असतो. त्याची उपासना आपण करायची असते. साधकाच्या साधनेचा प्रवास तम, रज ते सत्त्वगुणापर्यंत होत असतो; परंतु अती सत्त्वप्रधान वृत्तीही घातक ठरते. त्यामुळे साधकाने त्रिगुणातीत होणे आवश्यक असते. ‘मी कुणीतरी आहे’, असे वाटते, तोपर्यंत तुम्हाला काही साध्य होणार नाही. ‘मी कुणीच नाही’, असे वाटल्यावर तुम्ही काहीतरी साध्य करू शकाल. परंपरा टिकवून ठेवणे सोपे नसते, ते कठीण काम तुम्ही करत आहात.’’ आश्रम परिसरातील यज्ञकुंड पहातांना ते म्हणाले, ‘‘आध्यात्मिक त्रासाला सामोरे जाण्यासाठी नामजप हाच योग्य उपाय आहे.’’ ‘म्लेंच्छांना शांतीचा पाया नाही; त्यांचा इतिहासच तलवारीने गळा कापण्याचा आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.

या प्रसंगी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी संत कर्नल के.एस्. मजेथिया यांचा पुष्पहार, शाल आणि श्रीफळ अर्पण करून सन्मान केला, तसेच त्यांना ग्रंथही भेट देण्यात आला.

सनातन प्रभात नियतकालिकांची माहिती जाणून घेतांना डावीकडून सौ. किरण सिंग, श्री. प्रकाश नाईक, श्री. कुलदीप सिंग आणि संत कर्नल के.एस्. मजेथिया. त्यांना माहिती सांगतांना अधिवक्ता योगेश जलतारे

 

आश्रम पाहिल्यावर दिलेले अभिप्राय

१. आश्रमातील साधक ईश्वरप्राप्तीसाठी योग्य मार्गाने प्रयत्न करत आहेत. येथे सर्वजण गुरूंच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहेत.

– संत कर्नल के.एस्. मजेथिया

२. आश्रमातील सर्वजण मनमिळावू आहेत. आश्रमातील साधकांना भेटल्यावर मला पुष्कळ आनंद मिळाला. गोव्यात एवढा सुंदर सनातन आश्रम आहे, हे मला ज्ञातही नव्हते.

– सौ. किरण सिंग

Leave a Comment