
देहली – येथील प्रगती मैदानात २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत ‘विश्व पुस्तक मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शन कक्षाचे उद़्घाटन सनातन संस्थेचे संत पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांनी केले. या मेळाव्यात अनेक देशांतील प्रकाशकांनीही विविध भाषांतील पुस्तकांचे कक्ष लावले आहेत. सनातन संस्थेच्या या ग्रंथ प्रदर्शनाला शदाणी दरबारचे संत पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज यांनी भेट दिली. या प्रदर्शनाला अनेक जिज्ञासूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
