रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्‍थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

१. ‘सनातन धर्म शिकवण्‍यासाठी संस्‍थेद्वारे अत्‍याधुनिक पद्धतींचा उपयोग केला जात आहे’, हे पाहून पुष्‍कळ चांगले वाटले. माहितीजालाच्‍या (इंटरनेटच्‍या) काळात सनातन धर्माचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत करता येऊ शकतो. बहुतांश हिंदूंनाच आपल्‍या सनातन धर्माची पूर्ण माहिती नाही. त्‍यांना ती माहिती देण्‍याचे कार्य सनातन संस्‍था करत आहे. हे कार्य त्‍वरित करण्‍याची आवश्‍यकता आहे, अन्‍यथा भारतीय संस्‍कृती समाप्‍त होईल.’

– श्री. डी.पी. गुप्‍ता, देहली

 

२. ‘मी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला दुसर्‍यांदा भेट दिली. तेव्‍हा मला पहिल्‍या भेटीप्रमाणेच पुष्‍कळ चैतन्‍य मिळाले. येथे सगळे काही व्‍यवस्‍थित आहे. येथे सगळे साधक आणि साधिका आनंदमय वातावरणात रहातात.’

– श्री. प्रमोद फडते, टाईल्‍स व्‍यावसायिक, ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि विज्ञापनदाता, चिंबल, गोवा. (२.११.२०२२)

 

३. ‘रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात कल्‍पना करू शकत नाही, असे वेगळेच वातावरण आहे आणि आध्‍यात्मिकता आहे’, असे मला वाटले. येथील सर्वांचे चेहरे आनंदी आहेत. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ‘सगळीकडे दैवी शक्‍ती कार्यरत आहे’, असे मला वाटले.’

– सौ. संध्‍या प्रमोद फडते, चिंबल, गोवा. (२.११.२०२२)

 

४. ‘आश्रमाची रचना आणि व्यवस्थापन उत्कृष्ट आहे. येथील सर्व साधकांच्या चेहर्‍यावर आनंद आणि शांती दिसते. आश्रमात चालू असलेले संशोधनकार्य आश्चर्यकारक आहे. आश्रमात सर्वत्र चैतन्य जाणवते. त्याचा लाभ मला माझ्या साधनेसाठी निश्चितपणे होईल. आश्रम पहाण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.’

– श्री. सुनील भंडिवाड (बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांचे शिष्य), पुणे

 

५. ‘आश्रम पहातांना मला आलेल्या अनुभवांचे वर्णन मी शब्दांत करू शकत नाही. येथील प्रत्येक व्यक्तीची झालेली भेट अतुलनीय, आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय होती. आश्रमातील कार्य परमात्म्याच्या नेतृत्वाखाली चालू झाले असून त्याच परमात्म्याद्वारे ते पुढेही चालवले जाणार आहे.’

– श्री. अजित पद्मनाभ, (संस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक डब्लू.एच्.ओ. व्ही.आर्. (Founder & CEO WHO VR.), बेंगळुरू, कर्नाटक.

Leave a Comment