पुणे – धार्मिक आणि ज्योतिषतज्ञ प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांनी २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री २ वाजता वयाच्या ९६ व्या वर्षी देहत्याग केला. तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे. २३ फेब्रुवारीच्या दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांचे भक्त भारतासह परदेशातही आहेत. अमेरिका, हॉलंड, दुबई आणि इंग्लंड येथेही त्यांचा भक्तपरिवार आहे. ‘ॐ श्री विश्वदर्शनदेवतायै नम: ।’ या मंत्राचा जप करत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुणे एम्.आय.टी. येथे एका भव्य मंदिराचीही उभारणी करण्यात आली आहे.