पुणे, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – महाशिवरात्री निमित्त सनातन संस्थेने जिल्ह्यात अनेक शिव मंदिरांमध्ये ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये भगवान शिवाच्या उपासनेविषयीचे विविध ग्रंथ, अध्यात्म, साधना विषयक अन्य ग्रंथ, तसेच भीमसेनी कापूर, उदबत्ती, अत्तर आदी पूजोपयोगी सात्त्विक उत्पादने यांचा समावेश आहे. या ग्रंथप्रदर्शनांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख ग्रंथप्रदर्शनाच्या वेळा, तसेच ठिकाणे खालीलप्रमाणे –
१. शनिवार पेठ येथील श्री ओंकारेश्वर मंदिर, सकाळी ६ ते रात्री १०
२. धायरी, सिंहगड रस्ता येथील श्री धायरेश्वर मंदिर, पहाटे ५ ते रात्री १०
३. सहकारनगर येथील श्री अरण्येश्वर मंदिर, सकाळी ७ ते रात्री ९
४. कोथरूड येथील श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, सकाळी ७ ते रात्री ९
५. पिंपळे सौदागर येथील शिवमंदिर, सकाळी ७ ते रात्री १०
६. शाहूनगर चिंचवड येथील शिवशंभो फाउंडेशन, सकाळी ९ ते रात्री ९
७. पिंपरीतील मासोळकर कॉलनी येथील शिवदत्त मंदिर, सकाळी ९ ते रात्री ९
८. कासारवाडी, पिंपळे-गुरव, शास्त्रीनगर येथील सूर्य महादेव मंदिर, सकाळी ९ ते रात्री ९
९. भोसरी येथील स्वामी समर्थ शाळेजवळील श्री महादेव मंदिर, सकाळी ७ ते रात्री ९
१०. राजगुरुनगर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर, सकाळी ९ ते रात्री ८
११. विश्रांतवाडी, आळंदी रस्ता येथील श्री सोमेश्वर मंदिर, सकाळी ७ ते रात्री ११