नित्य धर्माचरण आणि धर्माधिष्ठित राज्यकारभार यांद्वारे आदर्श राज्यकारभार करणारा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभु श्रीराम ! प्रजेचे जीवन संपन्न करणारे; गुन्हेगारी, भ्रष्टाचार आदींना स्थान नसलेले अशी रामराज्याची ख्याती होती. असे आदर्श राज्य (हिंदू राष्ट्र) स्थापण्याचा निर्धार करूया.
१. रामराज्य (धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्र’) साकारणे, तुमच्याच हाती !
रामराज्यातील प्रजा धर्माचरणी होती; म्हणूनच तिला श्रीरामासारखा सात्त्विक राज्यकर्ता लाभला आणि आदर्श असे रामराज्य उपभोगता आले. तसेच आपणही धर्माचरणी अन् ईश्वराचे भक्त बनलो, तर पूर्वीसारखेच रामराज्य (धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र ) आताही अवतरेल !
२. कलियुगातील रामराज्य (हिंदू राष्ट्र) असे असेल !
अ. व्यक्ती, समाज अन् राष्ट्र यांचा सर्वांगीण उत्कर्ष करणे, हे धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्रा’चे प्रमुख ध्येय असेल !
आ. ‘हिंदू राष्ट्रा’त धर्म हाच नीतीनियम, राज्यकारभार आणि समाजव्यवस्था यांचा केंद्रबिंदू असेल !
इ. ‘हिंदू राष्ट्रा’तील सर्वच राज्यकर्ते धर्मपालक, नीतीमान, नि:स्वार्थी, जनतेवर पितृवत प्रेम करणारे असतील !