मुंबई – दादर येथील शिवाजी पार्क येथून २९ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने हिंदु बंधू-भगिनी सहभागी झाल्या होत्या. राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा आणावा, अशी मागणी या मोर्च्यामध्ये करण्यात आली.

🚩 जय श्रीराम 🚩
लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल जिहाद, धर्मांतरण यांच्या विरोधात हिंदुंचा भव्य…
॥ हिंदू जन आक्रोश मोर्चा ॥
शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे रविवार दि. २९ जनवरी २०२३ रोजी संपन्न
आयोजक : सकल हिंदू समाज, मुंबई pic.twitter.com/YzVWnq9NuL
— HJS Mumbai (@HJSMumbai) January 29, 2023
भाजपचे आमदार आशिष शेलार, तसेच भारती लवेकर, मनीषा चव्हाण आदी लोकप्रतिनिधी मोर्च्यात सहभागी झाले होते. विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांसह स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी झाले होते.