अनुक्रमणिका
- १. ‘जे.एन्.यू.’चा भारतविरोधी शक्तींकडून संदेशवाहक म्हणून वापर !
- २. स्वातंत्र्यानंतर दिसलेला भारतविरोधी शक्तींचा ब्राह्मणविरोधी ‘अजेंडा’ !
- ३. ‘जे.एन्.यू.’चा भारतविरोधी शक्तींकडून राजकीय हेतूने ‘टूलकिट’ म्हणून वापर !
- ४. ‘जे.एन्.यू.’मधील देशविरोधी विद्यार्थी संघटनांची अभिव्यक्ती नाही,तर भारतविरोधी शक्तींची ‘अजेंडा बेस्ड प्रपोगंडा’ (विशिष्ट धोरणावर आधारित प्रचार) चळवळ !
- ५. सर्वाेच्च न्यायालयाला दायित्वाचा विसर कि हेतूपूर्वक दुर्लक्ष !
- ६. ब्राह्मण म्हणजे काय ?
- ७. ‘जे.एन्.यू’मध्ये देशविरोधी टोळीचा ‘प्रपोगंडा’ (प्रचार) उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर ! – हर्षवर्धन त्रिपाठी, ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक, ‘एच्.व्ही.टीव्ही’
गेल्या मासात नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या (‘जे.एन्.यू.’च्या) परिसरातील अनेक भिंतींवर ब्राह्मण आणि व्यापारी यांच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या. हे कृत्य साम्यवादी (कम्युनिस्ट) विचारसरणीशी संबंधित विद्यार्थ्यांनी केल्याचे म्हटले जाते. या संदर्भात ‘जम्बू द्वीप’ या यू ट्यूब वाहिनीवर सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि ज्येष्ठ पत्रकार तथा ‘एच्.व्ही. टीव्ही’चे संपादक हर्षवर्धन त्रिपाठी यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यातील श्री. चेतन राजहंस यांनी केलेल्या उद्बोधनाचा संपादित अंश येथे देत आहोत.
१. ‘जे.एन्.यू.’चा भारतविरोधी शक्तींकडून संदेशवाहक म्हणून वापर !
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये (‘जे.एन्.यू.’मध्ये) एका ‘अजेंडा’च्या (विशिष्ट उद्देशाच्या) अंतर्गत ‘ब्राह्मणविरोध’ करण्यात येत आहे. या देशात शैक्षणिक संस्था (ॲकेडेमिया) आणि माध्यमे (मिडिया) अनेक वर्षांपासून साम्यवाद्यांच्या कह्यात राहिली आहेत. यापैकी ‘जे.एन्.यू.’ हे सध्या साम्यवादी विचारांचे प्रचाराचे गड बनलेले आहे.
‘जे.एन्.यू.’ हे सध्या साम्यवादी, धर्मनिरपेक्षवादी, जिहादी, मिशनरी संघटना यांचे देशभर संदेश पोचवण्याचे एक माध्यम बनले आहे. किंबहूना या सर्व भारतविरोधी शक्तींकडून ‘जे.एन्.यू.’चा संदेशवाहक म्हणून उपयोग करण्यात येतो. मुळात त्यांचा ‘अजेंडा बेस प्रपोगंडा’ (उद्देशाधारित प्रचार) हा राजकीय आहे.
२. स्वातंत्र्यानंतर दिसलेला भारतविरोधी शक्तींचा ब्राह्मणविरोधी ‘अजेंडा’ !
‘जे.एन्.यू.’मध्ये ज्या घोषणा दिल्या गेल्या, ती प्रथमच घडलेली घटना नसून यापूर्वीही मिशनरी, जिहादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि साम्यवादी यांच्या भारतविरोधी शक्तींनी ब्राह्मणविरोधी ‘अजेंडा’ चालवला होता. या भारतविरोधी शक्तींना ब्राह्मण समाजाला, म्हणजे बुद्धीवादी समाजाला कलंकित करून भारताचे होऊ घातलेले पुनरुत्थान थांबवायचे आहे.
२ अ. गांधीहत्येनंतरच्या ब्राह्मणविरोधी दंगली
विशेषत: वर्ष १९४८ मध्ये गांधी हत्या झाली. तेव्हा नथुराम गोडसे ब्राह्मण असल्याने त्यांच्या विरोधात देशभरात आणि महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी ब्राह्मणविरोधी दंगली झाल्या. त्यात रा.स्व. संघाच्या अनेक स्वयंसेवकांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली.
‘गोडसे हे संघाचे कार्यकर्ते आणि ब्राह्मण असणे’, हे त्यामागील कारण होते. स्वातंत्र्यानंतर लगेच वर्ष १९४८ मध्ये रा.स्व. संघावर ‘ब्राह्मणांची संघटना’ म्हणून ठपका ठेवण्यात आला. त्या काळात संघ ही मोठी आणि लोकप्रिय संघटना होती. हा तो काळ होता, जेव्हा ‘बीबीसी’ रेडिओवर केवळ प.पू. गोळवलकर गुरुजी आणि जवाहरलाल नेहरू यांचीच भाषणे प्रसारित होत असत. तेव्हा ‘संघाचे नाव कलंकित व्हावे’, असे नेहरूंना वाटत होते. त्यासाठी ‘रा.स्व. संघ, म्हणजे ब्राह्मण’, अशा प्रकारचा अपप्रचार करण्यात आला आणि गांधीहत्येनंतर महाराष्ट्रात ब्राह्मणविरोधी दंगली करण्यात आल्या. अर्थातच हे रा.स्व. संघाला दडपण्यासाठी होते.
२ आ. तामिळनाडूतील ब्राह्मणविरोध
पुढे हीच क्लृप्ती ख्रिस्ती-द्रविडी संघटनांनी तमिळनाडूमध्ये वापरली आणि तेथे ब्राह्मणविरोधी चळवळ राबवली, जी वर्ष १९७० पर्यंत चालली. या चळवळीने ब्राह्मणविरोधी पेरियारला गुरु मानले. या चळवळीमुळे मूळ ब्राह्मणांनी तमिळनाडूमधून पलायन केले. परिणामी आज तेथील मंदिरे किंवा तीर्थक्षेत्रे येथे ब्राह्मण मिळेनासे झाले आहेत. तेथे लग्न करण्यासाठीही ब्राह्मण मिळत नाही, अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.
२ इ. काश्मीरमधील पंडितांच्या पलायनाकडे दुर्लक्ष !
काश्मीरच्या खोर्यातून जिहादी आतंकवादी शक्तींनी काश्मिरी हिंदूंना पलायन करण्यास बाध्य केले, तेव्हा धर्मनिरपेक्षतावादी आणि साम्यवादी राजकीय शक्तींकडे काश्मीरी पंडित म्हणजे ब्राह्मण समुदाय असा विचार केला आणि त्यांच्या पलायनाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.
३. ‘जे.एन्.यू.’चा भारतविरोधी शक्तींकडून राजकीय हेतूने ‘टूलकिट’ म्हणून वापर !
‘जे.एन्.यू.’चा ‘टूलकिट’ (विशिष्ट उद्देशाने अपप्रचार करण्याचे षड्यंत्र) म्हणून वापर करण्यात आला आहे. तेथे केवळ ‘ब्राह्मण छोडो’ ही एकच घोषणा करण्यात आली नाही, तर ‘बनिया छोडो’ (व्यापार्यांनी देश सोडून जा) ही घोषणाही करण्यात आली आहे. त्यानंतर ‘खून बहेगा, खून बहेगा’ (रक्त वाहील, रक्त वाहील) ही घोषणा करण्यात आली. यातून ब्राह्मण आणि बनिया (व्यापारी) या दोघांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. येथे लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे सध्या अंबानी आणि अदानी हे उद्योगपती ज्या गतीने त्यांच्या आर्थिक व्यापारात उन्नती करत आहेत, त्यांच्या उन्नतीकडे राष्ट्रवादी सरकार अन् उद्योगपती यांच्यात साटेलोटे असल्याच्या दृष्टीकोनातून भारतविरोधी शक्ती पहात आहेत. भारताच्या मुख्य उद्योगपतींना लक्ष्य करण्यासाठीच वैश्य समाजाला लक्ष्य करण्यात येत आहे. हे गंभीर आहे. त्यातही ही ‘बनिया छोडो’ची घोषणा नुकत्याच झालेल्या गुजरातच्या निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. गुजराथी समाजातील व्यापारी समाज हा सधनवर्ग समजला जातो. म्हणजेच ही एक प्रकारे राजकीय घोषणा होती, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
४. ‘जे.एन्.यू.’मधील देशविरोधी विद्यार्थी
संघटनांची अभिव्यक्ती नाही,तर भारतविरोधी शक्तींची
‘अजेंडा बेस्ड प्रपोगंडा’ (विशिष्ट धोरणावर आधारित प्रचार) चळवळ !
भारतातील कुठल्याही एका वर्गाला होणारा विरोध लोकशाही दृष्टीकोनातूनही चुकीचा आहे; कारण भारतीय राज्यघटनेत अभिव्यक्तीस्वातंत्र्याला सामाजिक स्वास्थ्य, लोकव्यवस्था, सदाचार किंवा नैतिकता यांच्या मर्यादा घालण्यात आल्या आहेत. एखाद्या विशिष्ट गर्वाला अर्थात् ब्राह्मण आणि व्यापारी समुदायाला भारत सोडून जा, असे विद्वेषी आवाहन करणे, हे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे आहे. हा जातीय द्वेष असून एक प्रकारे लोकव्यवस्थेच्या विरोधातील युद्ध आहे.
‘खून बहेगा’ ही घोषणा संपूर्णपणे कायद्याच्या विरोधात आहे. हे कुठलेही सदाचारी वा नैतिक कृत्य नव्हे, जे राज्यघटनेला अभिव्यक्तीस्वातंत्र्यात अभिप्रेत आहे. भारत सरकारने याची गांभीर्याने नोंद घेऊन अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली नाही, तर ‘अजेंडा बेस्ड प्रपोगंडा’ चळवळ राबवणार्यांना कारावासात पाठवले पाहिजे.
५. सर्वाेच्च न्यायालयाला दायित्वाचा विसर कि हेतूपूर्वक दुर्लक्ष !
‘जे.एन्.यू.’ हे एक विश्वविद्यालय आहे. तेथे कार्यवाही करण्यासाठी सरकारी अन्वेषण यंत्रणांना मर्यादा आहेत; कारण विश्वविद्यालय हा कुलपती, राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्याशी संबंधित भाग आहे. तेथील व्यवस्था त्यांच्या हातात असून ते स्वायत्तपणे काम करतात. अशा परिस्थितीत ‘स्युओमोटो’ची (एखाद्या प्रकरणात न्यायालय स्वत:हून लक्ष घालून याचिका करते) कारवाई करणे न्यायालयांच्या हातात असते. या ठिकाणी सरकार किंवा सरकारी यंत्रणा यांच्या मर्यादा लक्षात घेऊन सर्वाेच्च न्यायालयाने ‘स्युओमोटो’ची कारवाई करणे आवश्यक होते. अशा प्रकारच्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या, जे पुढे भारताचे नागरिक होणार आहेत. जे एवढ्या मोठ्या सरकारी व्यवस्थेत शिकतात आणि ज्यांच्यावर सरकारचे प्रत्येकी ३ लाख रुपये व्यय होतात, तेथे अशा प्रकारची घोषणा देणे अतिशय गंभीर आहे. तेव्हा सर्वाेच्च न्यायालयाच्या कानापर्यंत या घोषणा पोचून त्यांच्याकडून यावर ‘स्युओमोटो’सारखी कारवाई होणे अपेक्षित होते. अन्वेषण यंत्रणा पुरावे ठेवतील आणि न्यायालय न्याय करील; पण न्यायाधीशही प्रतिदिन वृत्तपत्रे वाचत असतात किंवा सामाजिक माध्यमांवर सक्रीय असतात. त्यामुळे ते अशा घटनांकडे दुर्लक्ष कसे करू शकतात ?
६. ब्राह्मण म्हणजे काय ?
६ अ. दर्शनशास्त्रामध्ये ‘ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः । (अर्थ : जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण)’, अशी ब्राह्मणाची व्याख्या करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीची उच्च आध्यात्मिक उन्नती होते, तेव्हा त्याला ‘मी स्वत: ब्रह्म आहे’, अशी आत्मानुभूती येते. त्यालाच ब्राह्मण म्हटले गेले आहे. प्राचीन काळात अशी अनुभूती आलेल्या ऋषींना ब्राह्मण म्हटले गेले.
६ आ. रामायण आणि महाभारत यांमध्ये जी वर्णव्यवस्था दाखवण्यात आली, त्यात ‘ब्रह्म जाणण्यासाठी अध्ययन (म्हणजे स्वतः साधना किंवा तपस्या करणारे) आणि अध्यापन कार्य करणारे ब्राह्मण’, असे समजण्यात आले आहे. महाभारतात भगवान श्रीकृष्णाने वर्णव्यवस्थेविषयी सुंदर विवेचन केले आहे.
‘चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक १३
(अर्थ : मी (भगवान श्रीकृष्णाने) गुण आणि कर्म यांनुसार चार वर्णांची निर्मिती केली.) असे म्हटले आहे. या अर्थाने ब्रह्म जाणण्यासाठी आवश्यक सात्त्विक गुण
असणार्यांना किंवा त्यासाठी अध्यापन कार्य करणार्यांना ब्राह्मण म्हटले गेले. ‘क्षतात त्रायते इति क्षत्रियः’ अर्थात् समाजाचे दुःख दूर करण्यासाठी आवश्यक राजसिक गुण ज्यांच्यात होते, त्यांना क्षत्रिय म्हणण्यात आले.
६ इ. हिंदु दर्शनशास्त्रात ‘व्यक्ती जन्मत: शुद्र असते’, असे सांगतांनाच ‘व्यक्तीची साधना, गुण-कर्म आणि संस्कार यांच्यामुळे ती विविध वर्ण प्राप्त करते’, असे म्हटलेले आहे.
६ ई. साधारणतः ५ सहस्र वर्षांपूर्वी वर्णव्यवस्थेला ग्लानी आल्यावर जातीव्यवस्था निर्माण झाली आणि जन्मानुसार जातींची निर्मिती चालू झाली. खरे तर जातीव्यवस्था ही कुठल्याही समाजातील एक नैसर्गिक व्यवस्था असते. भारतात जशी जातीव्यवस्था आहे, तशी अरबस्तानात ‘कबिले’ आहेत, तर युरोपमध्ये ‘हाऊजेस’ आहेत.
ब्राह्मण जातीत जन्मल्यावर समाजाने त्याला अध्ययन आणि अध्यापन हे कार्य सोपवले. जो दु:खांचे परिहार करतो किंवा दु:खापासून समाजाचे रक्षण करतो, त्याला क्षत्रिय म्हटले गेले. त्याचप्रमाणे प्रत्येक जातीनुसार प्रत्येकाला कामे विभागून देण्यात आली होती.
आपल्याकडे धर्माला ग्लानी येते आणि परत धर्मसंस्थापना होते. आज ग्लानीचा काळ चालू आहे. ब्राह्मण जातीलाही ग्लानी आली आहे. त्यामुळे सरसकट सर्वांना ब्राह्मण म्हणून त्यांच्याकडे आदर्श दृष्टीने पहाण्यापेक्षा ब्रह्म जाणणार्यालाच ब्राह्मण म्हटले पाहिजे. जन्माने शुद्र असला, तरी तो तपस्येने ब्राह्मण बनू शकतो. त्यामुळे धर्मसंस्थापना करायची असेल, तर आध्यात्मिक गुण, कर्म यांच्या आधारे व्यक्तीचा विचार व्हायला पाहिजे किंवा ‘ब्राह्मण’ शब्दाची धर्माला अभिप्रेत आध्यात्मिक व्याख्या समजून घेतली पाहिजे.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था (२१.१२.२०२२)
७. ‘जे.एन्.यू’मध्ये देशविरोधी टोळीचा ‘प्रपोगंडा’ (प्रचार) उद्ध्वस्त
होण्याच्या मार्गावर ! – हर्षवर्धन त्रिपाठी, ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक, ‘एच्.व्ही.टीव्ही’
‘जे.एन्.यू’ असो किंवा अन्य कोणतेही विश्वविद्यालय ते द्वेष, घृणा आणि विष पसरवण्याचा प्रयत्न करणार्या चळवळीचा भाग बनू शकत नाही. ही काही लोकांची घृणास्पद मानसिकता आहे, जी युवकांचे आणि शिक्षणाचे केंद्र असलेल्या ‘जे.एन्.यू’शी जोडून प्रचारित करण्यात येते. ‘जे.एन्.यू’मध्ये अशा प्रकारचे लोक पुष्कळ नाहीत; पण त्यांना अधिक काळ सत्ता आणि संरक्षण मिळाल्यामुळे त्यांचा प्रभाव अधिक दिसून येतो. असे वाटते की, तेच ‘जे.एन्.यू’ची खरी ओळख आहे. याच ‘जे.एन्.यू’मध्ये पुष्कळ पूर्वीपासून स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेऊन चालतांना राष्ट्र बलवान करणारे विद्यार्थी अतिशय पुढे होऊन मत व्यक्त करत असतात. जेव्हा ‘जे.एन्.यू’च्या भिंतींवर ‘ब्राह्मण, भारत छोडो’, अशा प्रकारे काही लिहिण्यात येते, तेव्हा ते लोकांना एकदम प्रभावित करते.
‘जे.एन्.यू’मध्ये चांगल्या पद्धतीने श्री रामनवमी किंवा दुर्गाेत्सव साजरे केले जातात; पण त्याहून दुर्गादेवीविषयी आक्षेपार्ह गोष्टींचीच अधिक चर्चा होते. मला वाटते की, या लोकांची संख्या अल्प आहे. या लोकांना निवडून चर्चेतून बाहेर करावे लागेल. त्यांची ही घृणा आणि विष पसरवण्याची पद्धत हळूहळू निष्फळ होत आहे. पूर्वी यात त्यांना सहजपणे यश मिळत होते; पण आता ‘जशास तसे’ प्रत्युत्तर मिळत आहे आणि अशा प्रकारचा ‘प्रपोगंडा’ही उद्ध्वस्त होत आहे.