पुण्यप्राप्तीच्या दृष्टीने आणि देहाची शुद्धी होऊन वाईट शक्तींचा त्रास दूर होण्यासाठी उन्नतांनी वापरलेल्या वस्तू वापरणे फलदायी ठरते. संतांनी वापरलेली वस्त्रे वापरल्याने कोणते आणि कसे लाभ होतात, हे या लेखातून पाहूया.
उन्नतांनी वापरलेली वस्त्रे वापरण्याचे लाभ
उन्नत (संत) हे चैतन्याचा स्त्रोत असतात. त्यांनी वापरलेल्या वस्तूंमध्येही चैतन्य येते. ‘उन्नतांनी वापरलेल्या वस्तू वापरणे, हे पुण्यप्राप्तीच्या दृष्टीने आणि देहाची शुद्धी होऊन वाईट शक्तींचा त्रास दूर होण्याच्या दृष्टीने फलदायी ठरते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ कृष्ण एकादशी, कलियुग वर्ष ५११० (३.३.२००८, सकाळी १०.४४)
उन्नतांच्या (संतांच्या) कपड्यांतील चैतन्यामुळे वाईट शक्तींचा त्रास दूर होण्याच्या संदर्भातील सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण आणि अनुभूती हे समजून घेण्यापूर्वी सनातनच्या साधकांना होणारा अनिष्ट शक्तींचा त्रास आणि तो दूर करण्यासाठी त्यांच्यावर केले जाणारे आध्यात्मिक उपाय यांची माहिती जाणून घेऊया.
१. अनिष्ट शक्तींचा त्रास
वाईट शक्ती म्हणजे मनुष्याला त्रास देणारे भुवलोक आणि पाताळ येथील अदृश्य जीव (लिंगदेह). अनिष्ट शक्तींचे भूत, पिशाच्च, हडळ यांसारखे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांपैकी मांत्रिक म्हणजे सर्वांत बलाढ्य अनिष्ट शक्ती होय. सनातनचे साधक व्यष्टी (वैयक्तिक) साधनेसह समष्टी साधना (धर्मप्रसार आणि धर्मजागृती) करून त्याद्वारे समाजाची सात्त्विकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांना आसुरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणार्या अनिष्ट शक्तींच्या, विशेषतः मांत्रिकांच्या आक्रमणांना सामोरे जावे लागते.
२. आध्यात्मिक उपाय
पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, म्हणजे सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेल्या साधकांचा विभाग म्हणजे सनातनचा ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक विभाग’. या विभागातील साधक प्रार्थना, नामजप आणि भक्तीभाव यांच्या बळावर अनिष्ट शक्तींशी सूक्ष्मातून लढतात. त्याला ‘आध्यात्मिक उपाय’ असे म्हणतात. त्रास असलेला साधक स्वतःही प्रार्थना, नामजप आणि भक्तीभाव यांच्या बळावर लहान अनिष्ट शक्तींशी लढू शकतो. संतांचे बोलणे, संतांचा स्पर्श, संतांनी वापरलेल्या वस्तू आणि संतांचे निवासस्थान यांमुळेही साधकावर आध्यात्मिक उपाय होतात.
संतांनी वापरलेल्या वस्तूत चैतन्य असल्याने तिच्यावर कोणत्याच गोष्टीचा स्थुलातून, तसेच सूक्ष्मातूनही परिणाम होत नाही, हे लक्षात येते. म्हणूनच साबणातील रज-तमात्मक गंध हातरुमालातील चैतन्यातच सामावून नष्ट झाल्याने हातरुमाल धुतल्यावरही साबणाच्या वासापासून मुक्त राहिला.
हातरुमालाने वातावरणातील मायावी चैतन्य आकृष्ट करून घेऊन
ते नष्ट केल्याने विघटनाचा जांभळा रंग दिसणे आणि यातून संतांनी
वापरलेल्या गोष्टी समष्टीच्या कल्याणासाठी कशा प्रकारे झटत असतात, ते लक्षात येणे
मी आध्यात्मिक उपायांसाठी उन्नतांनी वापरलेला हातरुमाल डोळ्यांवर ठेवून झोपले होते. त्या वेळी लक्षात आले की, ‘हातरुमाल वातावरणातील चैतन्य ओढून घेत आहे.’ हे चैतन्य पिवळ्या प्रकाशाच्या रूपात दिसत होते आणि लगेच त्यानंतर विघटनाचा जांभळा रंग दिसत होता. त्या वेळी माझ्या मनात आले, ‘हातरुमाल हा स्वतःच चैतन्यमय असल्याने त्याला वातावरणातून चैतन्य ओढून घेण्याचे काय कारण ?’ नंतर लक्षात आले, ‘वातावरणात मांत्रिकांनी साधकांवर आक्रमण करण्यासाठी पसरलेले मायावी चैतन्य हातरुमाल स्वतःकडे आकृष्ट करून ते नष्ट करत असल्याने लगेच विघटनाचा जांभळा रंग दिसत होता. यावरून संतांच्या वस्तू समष्टीच्या कल्याणासाठी कशा प्रकारे झटत असतात, ते माझ्या लक्षात आले.’
– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा, आषाढ कृष्ण ११, कलियुग वर्ष ५११० (२९.७.२००८)
समर्थ रामदासस्वामी यांच्या समाधीवर घातलेल्या कापडातून चैतन्य बाहेर पडणे,
त्या चैतन्यामुळे साधिकेला त्रास देणार्या मांत्रिकाची मायावी रूपे जळतांना दिसणे
अन् हवेतील काळी शक्ती आणि स्थाने नष्ट होऊन हवेत चैतन्य पसरतांना दिसणे
‘एकदा श्रीमती हसबनीसआजी यांनी समर्थ रामदासस्वामींच्या समाधीवर घातलेले कापड आमच्या समोर धरले आणि आम्हाला त्याच्याकडे बघायला सांगितले. त्या कापडातून पुष्कळ चैतन्य बाहेर पडत होते. मला त्रास देणार्या मांत्रिकाला ते चैतन्य सहन न झाल्यामुळे तो किंचाळू लागला. त्या चैतन्यामुळे मांत्रिकाची मायावी रूपे जळतांना दिसली. मांत्रिकाने हवेत निर्माण केलेली काळी शक्ती आणि स्थाने (काळी शक्ती साठवण्याची ठिकाणे) नष्ट होऊन हवेत चैतन्य पसरतांना दिसले.’ – कु. संगीता, गोवा.
(संतांनी समाधी घेतल्यानंतरही त्या ठिकाणी चैतन्य असते. हे चैतन्य समाधीवर घातलेल्या कापडातही येते. याच कारणासाठी संतांच्या समाधीवर डोके ठेवून दर्शन घेतले जाते. – संकलक)