म्हापसा (गोवा) येथील श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन !
म्हापसा – सनातन संस्था करत असलेले कार्य हे हिंदु राष्ट्राच्या निर्मितीतील पुष्कळ मोठे योगदान असेल. प्रत्येकामध्ये चांगले संस्कार रुजावेत आणि प्रत्येकाचे जीवन संस्कारमय व्हावे, यासाठी सनातन संस्थेच्या साधकांचा सातत्याने प्रयत्न असतो. त्यासाठी सनातन संस्थेचे साधक कार्यरत असतात. सनातन संस्था आणि संस्थेचे साधक निःस्वार्थीपणे कार्य करतात, असे गौरवोद्गार गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. म्हापसा, गोवा येथील ग्रामदैवत श्री देव बोडगेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव ५ जानेवारी या दिवशी चालू झाला आहे. या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे वितरण केंद्र उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि नारळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी वरील गौरवोद्गार काढले.
Hon Goa CM @DrPramodPSawant inaugurated Sanatan Sanstha’s exhibition at Shri Dev Bodgeshwar temple, Mapusa, Goa.
He appreciated Sanatan’s seekers & work.
Dr Sawant was impressed by the Knowledge in the books & asked people to visit Sanatan’s stall to learn about Spirituality pic.twitter.com/8IRmCH0nRG— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) January 5, 2023
मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले, ‘‘सनातन संस्थेच्या वतीने या जत्रोत्सवात अध्यात्म आणि साधना यांविषयी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे. श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवाला येणार्या भाविकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी. प्रदर्शनात ठेवण्यात आलेले ग्रंथ आणि लघुग्रंथ भाविकांनी त्यांच्या घरी नेऊन लहान मुलांपर्यंत म्हणजेच भावी पिढीपर्यंत पोचवावेत अन् संस्कारमय भावी पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत.’’ या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सनातन संस्था आणि सनातनचे साधक यांना शुभेच्छाही दिल्या.
सनातनचे साधक श्री. दिनेश हळर्णकर यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी म्हापसा मतदारसंघाचे आमदार आणि गोवा विधानसभेचे उपसभापती जोशुआ डिसोझा हेही उपस्थित होते. त्यांचे स्वागत सनातनचे साधक श्री. संजय नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. या वेळी म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. शुभांगी वायंगणकर, नगरसेवक तारक आरोलकर, नगरसेवक शेखर बेनकर, नगरसेवक सुशांत हरमलकर, नगरसेविका सौ. अन्वी कोरगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक तारक आरोलकर यांनीही श्रीकृष्णाच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण केला. या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन सनातनच्या साधिका सौ. नयना हळर्णकर यांनी केले.
‘सनातन संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेले ग्रंथ प्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे वितरण केंद्र ५ ते ११ जानेवारी या कालावधीत सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत भाविकांसाठी चालू असेल. जिज्ञासू आणि भाविक यांनी याचा लाभ घ्यावा’, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. |