सनातनचे ग्रंथ ‘ई-बुक’ स्वरूपात उपलब्ध करण्याच्या सेवेत योगदान द्या !

काळानुसार व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधनेला अधिक महत्त्व आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित करत असलेल्या सनातनच्या ग्रंथांच्या सेवेत सहभागी होणे, ही समष्टी साधना आहे. सध्या समाजामध्ये संगणक, भ्रमणभाष इत्यादींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे सनातनचे ग्रंथ समाजाला ‘ई-बुक’ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मोठी सेवा उपलब्ध झाली आहे. (‘ई-बूक’ : एखाद्या पुस्तकाचे ‘डिजिटल’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक’ स्वरूपातील रूपांतर !) या सेवेसाठी या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आणि साधक यांची आवश्यकता आहे. या अंतर्गत पुढील सेवा उपलब्ध आहेत.

१. ‘इन डिझाईन’, ‘फोटोशॉप’ या संगणकीय प्रणालींच्या माध्यमातून ग्रंथांची संरचना करणे

२. अन्य ‘ई-बुक्स’च्या पद्धतींचा अभ्यास करणे, तसेच सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे ‘ई-बुक्स’चा प्रसार करणे

३. तांत्रिक : सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या अंतर्गत JavaScript programming करणे

४. या संदर्भातील सेवा करण्यासाठी दायित्व घेऊन समन्वय आदी सेवा करणे

वरील सेवांमध्ये योगदान देऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या धर्मकार्यातील सहभागाद्वारे मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्या ! या सेवेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी पुढील सारणीनुसार स्वत:ची माहिती कळवावी.

ज्या साधकांना या सेवेसंबंधी ज्ञान आहे आणि ही सेवा करण्याची आवड आहे, त्यांनी किंवा जे शिकून घेऊन शक्य तितका वेळ घरी सेवा करू शकतात, अशांनीही पुढील पत्त्यावर संपर्क करावा.

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा, पिन – ४०३४०१.

(२७.१०.२०२२)

Leave a Comment