सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र आणि त्यांची वैशिष्ट्ये

सूक्ष्म जगतातील घडामोडींची जगताला ओळख करून
देऊन त्यासंदर्भात आध्यात्मिक संशोधन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

`संकेतस्थळावर असलेल्या विविध लेखांमध्ये ठिकठिकाणी धर्मशास्त्र सांगण्यासाठी ‘सूक्ष्म-चित्रां’चे साहाय्य घेतलेले आपल्याला दिसेल. प्रस्तूत लेखात आपण ‘सूक्ष्म’ म्हणजे नेमके काय तसेच त्याच्या संबंधित विविध संज्ञांचा अर्थ समजून घेणार आहोत. तसेच ‘सूक्ष्म-चित्रे’ प्रसिद्ध करण्यामागील उद्देश, सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्राची परिभाषा आणि वैशिष्ट्ये यांविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेऊया.

 

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संशोधनकार्याचा ‘सूक्ष्मातून स्थुलाकडे’ प्रवास

सामान्यतः संशोधनाची दिशा ‘ज्ञाताकडून अज्ञाताकडे’, म्हणजेच ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ अशी असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात मात्र आधी सूक्ष्मातील संशोधन आणि मग स्थुलातील असा प्रचलित संशोधकांपेक्षा विरुद्ध दिशेने प्रवास झाला आहे. साधारण वर्ष १९८७ च्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ध्यानातून उत्तरे मिळत असत. या उत्तरांची सत्यता पडताळण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले, उदा. न वाचलेल्या पुस्तकातील कोणत्या पानावर कोणते लिखाण आहे, हे ध्यानातून पाहून त्याचे वर्णन करणे आणि मग ‘प्रत्यक्ष पुस्तकाच्या त्या पानावर काय आहे’, हे पहाणे, ध्यानात अनोळखी व्यक्तीच्या घरी जाऊन नंतर तेथील वर्णन करणे आणि वर्णनाची सत्यता त्या व्यक्तीला विचारणे इत्यादी. अशा अनेक प्रयोगांतील उत्तरांची सत्यता ९५ टक्क्यांपेक्षा अधिक येऊ लागल्यावर ‘स्वतःला ध्यानातून मिळत असलेली उत्तरे सत्य आहेत’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लक्षात आले. त्यानंतर एखाद्या समस्येमागील विविध कारणांचे तुलनात्मक महत्त्व टक्केवारीत सांगणे (उदा. एखाद्याचा विवाह न होण्यामागील मूलभूत कारणांपैकी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारणे किती प्रमाणात आहेत), समस्यांवरील उपाय सांगणे आदी ते सूक्ष्मातून जाणूू लागले. सूक्ष्मातून ज्ञान मिळणे ही मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीने एक अमूल्य उपलब्धी आहे; कारण बुद्धी आणि अनुभव यांद्वारे उत्तरे मिळण्याला मर्यादा आहेत; परंतु सूक्ष्मातून कळणे अमर्याद आहे.

 

२. सूक्ष्मातून जाणण्याची पद्धत विकसित करण्यासंदर्भातील एकमेवाद्वितीय संशोधन

स्वतः परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातील कळणे आणि सूक्ष्मातून ज्ञान मिळणे साध्य झाल्यावर ते तिथेच थांबले नाहीत. अन्य साधकांमध्ये ही सूक्ष्मातील (म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील) जाणण्याची क्षमता कशी विकसित करता येईल, यासाठी त्यांनी सातत्याने संशोधनात्मक प्रयत्न केले. वर्ष २००६ मध्ये आरंभ झालेल्या या क्रांतीकारी संशोधनाच्या अंतर्गत त्यांनी आरंभी थोडेफार सूक्ष्मातील कळणार्‍या साधकांकडून वारंवार सूक्ष्म परीक्षण करवून घेतले. त्या माध्यमातून साधकांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता जागृत आणि कार्यरत झाली. कालांतराने ‘सूक्ष्मातील कळणार्‍या साधकांपैकी काही साधकांना हे बुद्धीअगम्य ज्ञान शब्दांच्या माध्यमातून, तर काही साधकांना चित्ररूपाने मिळते’, हे स्पष्ट झाले. यावरही समाधानी न रहाता त्यांनी या संदर्भातील संशोधन अव्याहतपणे चालू ठेवले.

 

३. ‘सूक्ष्म’ या शब्दाच्या संदर्भातील काही संज्ञांचा अर्थ

अ. सूक्ष्म

स्थूल पंचज्ञानेंदि्रये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, ते म्हणजे ‘सूक्ष्म’. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत, उदा.

भगवतो नारायणस्य साक्षान्महापुरुषस्य स्थविष्ठं रूपम् आत्ममायागुणमयम् अनुवर्णितम् आदृतः पठति शृणोति श्रावयति स उपगेयं भगवतः परमात्मनः अग्राह्यम् अपि श्रद्धाभकि्तविशुद्धबुदि्धः वेद । – श्रीमद्भागवत, स्कंध ५, अध्याय २६, सूत्र ३८

अर्थ : भगवंताचे उपनिषदांत वर्णन केलेले निर्गुण स्वरूप हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे. असे असले, तरी जो त्याच्या स्थूल रूपाचे वर्णन वाचतो, ऐकतो किंवा ऐकवतो, त्याची बुद्धी श्रद्धा आणि भक्ती यांमुळे शुद्ध होते आणि त्याला त्या सूक्ष्म रूपाचेही ज्ञान होते वा अनुभूती येते.

साधना केल्यामुळे सनातनच्या साधकांमध्ये श्रद्धा आणि भक्ती वृद्धींगत होत असल्यामुळे त्यांनाही सूक्ष्म रूपाचे ज्ञान होते वा सूक्ष्माशी संबंधित अनुभूती येतात. एकूणच धर्मग्रंथांत वर्णिलेल्या वचनांच्या सत्यतेची प्रचीती सनातनचे साधक घेत आहेत. सनातनच्या संकेतस्थळावर काही ठिकाणी ‘सूक्ष्म’ या शब्दाच्या संदर्भातील संज्ञा वापरल्या आहेत. त्यांची स्पष्टीकरणे पुढीलप्रमाणे आहेत.

आ. सूक्ष्म-जगत्

जे स्थूल पंचज्ञानेंदि्रयांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या असि्तत्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

इ. सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंचसूक्ष्मज्ञानेंदि्रयांनी ज्ञानप्राप्ती होणे)

काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

ई. सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण

एखाद्या घटनेविषयी किंवा प्रकि्रयेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

उ. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र

काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात. चित्रांच्या स्वरूपात मांडले जाणारे ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण’.

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र

सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र

 

४. संकेतस्थळांवरील लेखांमध्ये ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक
परीक्षणे’ आणि ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रे’ प्रसिद्ध करण्यामागील उद्देश

आपण स्थुलातून एखादी कृती केल्यावर त्या कृतीचा सूक्ष्मातून काय परिणाम होतो, हे कळण्याची क्षमता बहुतांश व्यक्तींमध्ये नसते. सूक्ष्मातील परिणाम कळल्यावर स्थुलातील कृतीविषयी श्रद्धा निर्माण होते. तसेच सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रांमुळे तात्त्विक ज्ञानातील (माहितीतील) कठीण भाग समजायलाही सोपा होतो. यासाठीच संकेतस्थळावरील लेखांमध्ये ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षणे’ आणि ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रे’ दिली आहेत.

 

५. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्राची परिभाषा आणि अन्य विश्लेषण

अ. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील अनुभूतीजन्य स्पंदने

सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील शक्ती, भाव, चैतन्य, आनंद, शांती इत्यादी स्पंदने ही सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्राच्या विषयाशी संबंधित असतात. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील घटक या स्पंदनांतून प्रतीत होतात.

आ. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रात शांतीची स्पंदने दर्शवली नसल्याचे कारण

शांतीच्या स्पंदनांमध्ये सर्वसाधारणपणे ७० टक्के निर्गुण आणि ३० टक्के सगुण, असे प्रमाण असते. त्यामुळे सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रकाराने चित्राच्या अनुषंगाने त्या स्पंदनांचा उल्लेख केलेला असला, म्हणजेच ती स्पंदने त्याला जाणवत असली, तरी ती त्याच्या सूक्ष्म-दृष्टीला दिसत नसल्याने ती सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रामध्ये दर्शवलेली नसतात.

इ. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील चांगली किंवा वाईट स्पंदने

सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील चांगली किंवा वाईट स्पंदने ही सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रकाराची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता, त्याला आध्यात्मिक त्रास असल्यास त्या त्रासाचे प्रमाण, त्याचा भाव इत्यादी घटकांनुसार सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रकाराला ग्रहण झालेल्या सर्व स्पंदनांचा एकत्रित परिणाम असतो. यामुळे दोन सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रकारांच्या स्पंदनांसंबंधीच्या निरीक्षणांमध्ये भेद असू शकतो.

ई. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र पहाणार्‍याला जाणवणारा चांगला किंवा त्रासदायक परिणाम

सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील चांगली किंवा त्रासदायक स्पंदने आणि सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रकाराची स्थिती यांनुसार ते सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र पहाणार्‍याला चांगला किंवा त्रासदायक परिणाम जाणवतो.

उ. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रकाराला सूक्ष्मातील दिसणे, जाणवणे आणि कार्यकारणभाव कळणे

उ १. सूक्ष्म-दर्शनेंद्रियांना, म्हणजे सूक्ष्म-डोळ्यांना सूक्ष्मातील स्पंदनांचे रूप, रंग आणि आकार दिसतो. सूक्ष्म-कर्मेद्रियांना, उदा. मनाला सूक्ष्मातील चांगले / त्रासदायक इत्यादी जाणवते. सूक्ष्म-बुद्धीला सूक्ष्मातील स्पंदनांचा कार्यकारणभाव जाणवतो.
उ २. प्रत्येकाची ही क्षमता वेगवेगळी असते.
उ ३. एखाद्या वस्तूच्या सूक्ष्म स्पंदनांचे रूप आणि रंग दिसणे, हे तेजतत्त्वाशी संबंधित आहे. चांगले किंवा त्रासदायक इत्यादी जाणवणे, हे विश्वमनाशी संबंधित आहे, तर त्याविषयी ज्ञान मिळविणे, हे विश्वबुद्धीशी संबंधित आहे.
उ ४. सध्या सनातनच्या सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रकारांनी काढलेल्या सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रांतील सत्यता ८० टक्के आहे.

६. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रकार साधिकेचा परिचय


सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रकार : कु. प्रियांका विजय लोटलीकर

कु. प्रियांका विजय लोटलीकर यांनी १९९५ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या १० व्या वर्षी साधनेला प्रारंभ केला. मे २००७ मध्ये त्यांनी ‘कमर्शियल आर्टस’ मध्ये पदविका प्राप्त केली आणि लगेच त्या सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पूर्णवेळ सेवा करू लागल्या. कु. प्रियांका २००१ पासून प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी, विविध आचार, संतांचे कार्यक्रम इत्यादींचे सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण आणि सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रांकन करण्याची सेवा करत आहेत.

पाकिटावर हात ठेवून स्पंदनांचा अभ्यास करतांना परात्पर गुरु डॉक्टर (वर्ष १९९९)

 

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संशोधनकार्याचा ‘सूक्ष्मातून स्थुलाकडे’ प्रवास

सामान्यतः संशोधनाची दिशा ‘ज्ञाताकडून अज्ञाताकडे’, म्हणजेच ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ अशी असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात मात्र आधी सूक्ष्मातील संशोधन आणि मग स्थुलातील असा प्रचलित संशोधकांपेक्षा विरुद्ध दिशेने प्रवास झाला आहे. साधारण वर्ष १९८७ च्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ध्यानातून उत्तरे मिळत असत. या उत्तरांची सत्यता पडताळण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले, उदा. न वाचलेल्या पुस्तकातील कोणत्या पानावर कोणते लिखाण आहे, हे ध्यानातून पाहून त्याचे वर्णन करणे आणि मग ‘प्रत्यक्ष पुस्तकाच्या त्या पानावर काय आहे’, हे पहाणे, ध्यानात अनोळखी व्यक्तीच्या घरी जाऊन नंतर तेथील वर्णन करणे आणि वर्णनाची सत्यता त्या व्यक्तीला विचारणे इत्यादी. अशा अनेक प्रयोगांतील उत्तरांची सत्यता ९५ टक्क्यांपेक्षा अधिक येऊ लागल्यावर ‘स्वतःला ध्यानातून मिळत असलेली उत्तरे सत्य आहेत’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लक्षात आले. त्यानंतर एखाद्या समस्येमागील विविध कारणांचे तुलनात्मक महत्त्व टक्केवारीत सांगणे (उदा. एखाद्याचा विवाह न होण्यामागील मूलभूत कारणांपैकी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारणे किती प्रमाणात आहेत), समस्यांवरील उपाय सांगणे आदी ते सूक्ष्मातून जाणूू लागले. सूक्ष्मातून ज्ञान मिळणे ही मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीने एक अमूल्य उपलब्धी आहे; कारण बुद्धी आणि अनुभव यांद्वारे उत्तरे मिळण्याला मर्यादा आहेत; परंतु सूक्ष्मातून कळणे अमर्याद आहे.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी काढलेल्या सूक्ष्मातील वैशिष्ट्ये दर्शवणार्‍या चित्रातील सूक्ष्म स्पंदने पडताळतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

 

८. सूक्ष्मातून जाणण्याची पद्धत विकसित करण्यासंदर्भातील एकमेवाद्वितीय संशोधन

स्वतः परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातील कळणे आणि सूक्ष्मातून ज्ञान मिळणे साध्य झाल्यावर ते तिथेच थांबले नाहीत. अन्य साधकांमध्ये ही सूक्ष्मातील (म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील) जाणण्याची क्षमता कशी विकसित करता येईल, यासाठी त्यांनी सातत्याने संशोधनात्मक प्रयत्न केले. वर्ष २००६ मध्ये आरंभ झालेल्या या क्रांतीकारी संशोधनाच्या अंतर्गत त्यांनी आरंभी थोडेफार सूक्ष्मातील कळणार्‍या साधकांकडून वारंवार सूक्ष्म परीक्षण करवून घेतले. त्या माध्यमातून साधकांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता जागृत आणि कार्यरत झाली. कालांतराने ‘सूक्ष्मातील कळणार्‍या साधकांपैकी काही साधकांना हे बुद्धीअगम्य ज्ञान शब्दांच्या माध्यमातून, तर काही साधकांना चित्ररूपाने मिळते’, हे स्पष्ट झाले. यावरही समाधानी न रहाता त्यांनी या संदर्भातील संशोधन अव्याहतपणे चालू ठेवले.

कु. प्रियांका लोटलीकर

 

९. सूक्ष्म ज्ञानावर आधारित चित्रांची निर्मिती

काही साधक त्यांना दृश्य स्वरूपात मिळणारे ज्ञान चित्ररूपात दाखवू लागले. या चित्रांना ‘सूक्ष्म ज्ञानावर आधारित चित्र’ ही संज्ञा देण्यात आली. आतापर्यंत साधकांनी काढलेली सूक्ष्म-चित्रे सूक्ष्मातील चांगल्या किंवा वाईट शक्ती, देवतेचे प्रभामंडळ किंवा सजीव किंवा निर्जीव वस्तूची सूक्ष्म स्पंदने, तसेच एखाद्या घटनेचा (उदा. धार्मिक विधी अथवा मध्यरात्री नृत्य-गायन केल्याचा व्यक्तीवर झालेला परिणाम) अशा अनेक प्रकारची आहेत.

९अ. सूक्ष्म चित्रांची अभ्यासपूर्वक वर्गवारी

या चित्रांच्या प्रकारांची वर्गवारी, ही सूक्ष्म चित्रांच्या जगतातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अमूल्य देणगी आहे. प्रारंभी सर्व चित्रांचा ‘सूक्ष्म चित्रे’ असा एकच गट होता. त्यानंतर त्यांचे ‘योग्य’ आणि ‘चुकीचे’ असे वर्गीकरण केले. त्याही नंतर मानसिक स्तरावरील चित्रकलेचे भासमान, काल्पनिक, मायावी आणि भावनात्मक हे ४ प्रकार आणि सूक्ष्म दृष्यावर आधारित ‘सत्य’ हा ५ वा प्रकार मिळून सर्व चित्रांचे त्यानुसार वर्गीकरण करता आले.

९आ. सूक्ष्मातील स्पंदने आणि रंग यांचे प्रमाणीकरण (Standardisation)

‘सूक्ष्म चित्रांची स्पंदने आणि रंग यांचे प्रमाणीकरण’ याच्या संदर्भातील संशोधन हे सूक्ष्म चित्रांच्या संशोधनातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एक प्रमुख योगदान आहे. सकारात्मक आणि नकारात्मक सूक्ष्म ऊर्जा वलय, प्रवाह, कण, स्पंदने आणि किरणांच्या स्वरूपात प्रक्षेपित होते. प्रत्येक स्वरूपाचे विशिष्ट कार्य आणि गुणधर्म असतात. सूक्ष्मातील रंग डोळ्यांना दिसत नाहीत, ते केवळ सूक्ष्म दृष्टीने पहाता येतात. ते पारदर्शक आणि स्वयंप्रकाशित असतात. त्यामुळे त्यांची सावली पडत नाही. स्थूल रंग एकमेकांत मिसळून एक तिसरा रंग निर्माण होतो; परंतु सूक्ष्म रंग एकमेकांत मिसळत नाहीत, हे वैशिष्ट्यपूर्ण शोध परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लावले.

९ इ. सूक्ष्म-चित्रांच्या सत्यतेची पडताळणी

९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांचे किंवा गुरूंचे मन आणि बुद्धी अनुक्रमे विश्‍वमन अन् विश्‍वबुद्धी यांच्याशी एकरूप झालेली असतात. त्यामुळे विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांतून ते कोणतेही उत्तर मिळवू शकतात किंवा त्यांना सूक्ष्मातील कळू शकते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन विभागाअंतर्गत सूक्ष्म चित्रे काढणार्‍या सर्व साधकांच्या प्रत्येक चित्राची सत्यता स्वतः परात्पर गुरु डॉ. आठवले पडताळतात. सूक्ष्म चित्राची सत्यता नेमकी किती आहे, हे ते टक्केवारीत सांगतात, तसेच त्यातील असत्य भाग दाखवून तो सुधारूनही घेतात.

 

१०. साधकांमध्ये स्थळ आणि काळ यांच्या
पलीकडे जाऊन सूक्ष्म ज्ञान मिळवता येण्याची क्षमता निर्माण करणे

प्रारंभी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सूक्ष्म चित्रकारांना एखादी वस्तू किंवा व्यक्ती समोर असतांना त्यांच्या संदर्भातील ज्ञान सूक्ष्मातून मिळत असे; परंतु वस्तू समोर नसतांना केलेल्या सूक्ष्म परीक्षणाची सत्यता अल्प असे. कालांतराने सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या साधनेतील वृद्धीमुळे, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळे आता त्यांना स्थळाच्या पलीकडे जाऊनही ज्ञान मिळवता येते, उदा. जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या अनोळखी व्यक्तीचे केवळ छायाचित्र किंवा ध्वनीचित्रफीत पाहून किंवा कोणतेही माध्यम समोर नसतांनाही तिच्याविषयी ज्ञान मिळवता येते.

एखादी घटना उलटून गेल्यानंतर काही काळाने त्याचे सूक्ष्म परीक्षण केल्यास त्याची सत्यता अल्प असते; कारण काळासह त्या घटनेची वातावरणातील स्पंदने न्यून होऊ लागतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सूक्ष्म चित्रकारांना आता नजीकच्या भूतकाळातील किंवा भविष्यकाळातीलच नाही, तर एखाद्या व्यक्तीच्या मागील जन्मातील घटनेविषयीही सत्य ज्ञान मिळू शकते.

सूक्ष्म-चित्रांच्या संशोधनासंदर्भातील वरील बारकाव्यांवरून त्या संशोधनाची व्याप्ती आणि खोली लक्षात येते.

 

११. सूक्ष्म ज्ञानावर आधारित चित्रांचे महत्त्व

एकूण सृष्टीपैकी दृश्य जगत केवळ १ टक्के आहे, तर सूक्ष्मातील जगत ९९ टक्के आहे. त्यामुळे या सूक्ष्म जगताचा मानवावर तेवढ्याच मोठ्या प्रमाणात परिणामही होतो; परंतु ते जगत सूक्ष्म असल्याने ते किंवा त्याचा परिणाम आपल्या समजण्याच्या पलीकडे असतो. सूक्ष्म जगताविषयी माहिती देण्यात सूक्ष्म ज्ञानावर आधारित चित्रे पुढीलप्रमाणे योगदान देतात.

११ अ. सूक्ष्म चित्रांच्या माध्यमातून आपल्याला सूक्ष्मातील घडामोडी दृश्य स्वरूपात समजण्यास साहाय्य होते.

११ आ. एखाद्या व्यक्तीच्या आध्यात्मिक स्थितीचे निदान करण्यासाठी या चित्रांचा वापर करता येतो.

११ इ. एखादी वस्तू किंवा व्यक्ती यांच्या संदर्भातील सूक्ष्म स्पंदने आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक कि नकारात्मक आहेत, याविषयी सूक्ष्म चित्रे वस्तूनिष्ठ माहिती देतात. यावरून ती वस्तू, व्यक्ती किंवा घटना टाळायची का, याविषयी निर्णय घेता येतो.

११ ई. मानवाला सूक्ष्म जगताविषयी कुतूहल असते. सूक्ष्म-चित्रे त्याच्या या जिज्ञासेचे काही प्रमाणात निराकरण करतात. असे करता करता एक दिवस मानवाच्या मनात सर्वांत सूक्ष्म असलेल्या ईश्‍वराविषयीही जाणून घेण्याचा विचार येईल आणि तो त्या दिशेने प्रयत्न करू लागेल. त्यानंतरच खर्‍या अर्थाने मानवाच्या आनंदप्राप्तीच्या दिशेने प्रवासाला आरंभ होईल.’

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

Leave a Comment