सणांशी संबंधित लहरी आणि त्यांचे कार्य

मानवाचा सर्वांगीण उत्कर्ष व्हावा, तसेच त्याच्या साधनेला चालना मिळावी, यासाठी हिंदु धर्मात सणांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक सणाच्या निमित्ताने पृथ्वीवर विविध प्रकारच्या लहरी कार्यरत होतात, ज्यामुळे ते साजरे करणार्‍यास साधनेसाठी साहाय्य होते. या लहरींविषयीची माहिती खालील कोष्टकातून जाणून घेऊया.

सण

संबंधित लहरी

लहरींचे कार्य

१. गुढीपाडवा धर्मलहरी धर्मकार्य करणार्‍या जिवांना क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज मिळण्यास साहाय्य (मदत) होणे
२. अक्षय तृतीया ब्रह्मलहरी तन, मन आणि धन यांचा त्याग करणार्‍या जिवांचा रजोगुण कमी होण्यास साहाय्य होणे
३. नागपंचमी पंचकसत्त्वलहरी पाच उच्चदेवतांचे (टीप १) तत्त्व असलेल्या लहरी या लहरींमध्ये शिवलहरींचे प्रमाण सर्वात जास्त असते. या शिवलहरी इतर चार लहरींचे नियमन करतात. या लहरींमुळे वैराग्य येण्यास साहाय्य होते.
४. श्रावणी इच्छालहरी जिवाचा मनोमयकोष कार्यरत होणे
५. दसरा विष्णुलहरी जिवाची चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वाढणे
६. वसुबारस कृष्णभक्तियुक्त लहरी जिवाचा ईश्वराप्रति भाव वाढण्यास साहाय्य होणे
७. धनत्रयोदशी यमलहरी शरीरातील प्राणवायु कार्यरत होणे
८. नरक चर्तुदशी क्षात्रतेजयुक्त लहरी जिवाची क्षात्रवृत्ति जागृत होण्यास साहाय्य होणे
९. लक्ष्मीपूजन दुर्गालहरी किंवा क्रियालहरी प्राणमयकोष कार्यरत होऊन जिवाची कार्यक्षमता वाढणे
१०. बलीप्रतिप्रदा हिरण्यगर्भलहरी किंवा भूमिलहरी प्राणमयकोषातील सत्त्वकणांचे प्रमाण वाढणे
११. भाऊबीज शिवलहरी शिवतत्त्व ग्रहण करण्याची क्षमता वाढणे
१२. तुळशी विवाह कृष्णचैतन्ययुक्त लहरी प्राणमयकोष आणि मनोमयकोष यांची शुध्दि होणे
१३. देवदिवाळी ब्रह्मज्ञानलहरी ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढणे
१४. मकरसंक्रांत तिर्यकलहरी प्राणमयकोषातील रजोकणांचे प्राबल्य वाढल्याने जिवाची प्राणशक्ति वाढणे
१५. नारळी पौर्णिमा वरूणलहरी जिवाची आपतत्त्व खेचण्याची क्षमता वाढणे

टीप १ –

प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले : पाच उच्चदेवता कोणत्या ?

श्री गुरुतत्त्व : श्रीराम, श्री दुर्गादेवी, हनुमान, दत्त आणि शिव (८.४.२००४, दुपारी २.५१) (मूळस्थानी)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment