अनुक्रमणिका
२. कामाचे स्वरूप क्रोध, लोभ आणि मत्सर (षड्रिपू) असणे अन् ते माणसाला पाप करायला प्रवृत्त करत असणे
३. पापप्रवृत्ती होण्याची सात कारणे
५. प्रायश्चित्त घेण्यास सांगितलेली पातके
६. महानिर्वाण तंत्राप्रमाणे पापकारणे
७. भ्रूणहत्येपेक्षा महाभयंकर पाप नसणे
९. छांदोग्य उपनिषदानुसार महापापे
प्रस्तुत लेखात आपण मानवाकडून घडणार्या पापांची कारणे पहाणार आहोत. स्वार्थ, षड्रिपू यांमुळे लागणारे पाप याविषयी माहिती दिलेली आहे. तसेच अधिवक्ते यांना लागणारे पाप, भिकार्यांशी संबंधित पाप, प्रायश्चित घ्यावे लागेल अशी पापकर्मे कोणती यांविषयीही पाहू.
हा लेख वाचून वाचकांना पाप-पुण्याकडे पहाण्याची एक नवी दृष्टी लाभावी आणि पाप-पुण्याच्या पलीकडे जाऊन आनंदप्राप्ती करून घेण्यासाठी सदैव साधना करण्याची प्रेरणा मिळावी, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !
१. स्वार्थ
स्वार्थाच्या प्रमाणात पाप असते.
२. कामाचे स्वरूप क्रोध, लोभ आणि मत्सर (षड्रिपू)
असणे अन् ते माणसाला पाप करायला प्रवृत्त करत असणे
‘काम पाप करवतो. क्रोध आणि लोभ हे कामाचेच स्वरूप आहे. मत्सरही त्याचेच वेगळे रूप आहे. हे विकार माणसाला पाप करायला प्रवृत्त करतात आणि त्याचा अधःपात करतात.’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३
३. पापप्रवृत्ती होण्याची सात कारणे
श्रद्धाहानिः तथा असूया दुष्टचित्तत्वमूढते ।
प्रकृतेर्वशर्वितत्वं, रागद्वेषौ च पुष्कलौ ।
परधर्मरूचित्वं चेत्युक्ता दुर्मार्ग सप्ततः ।
अर्थ : श्रद्धाहानी, असूया, दुष्टचित्त, तत्त्वमूढता, स्वभावाला वश होणे, रागद्वेषाची विपुलता आणि परधर्मरूची या सात गोष्टी माणसाकडून पापे करवतात.
४. भिकार्यांशी संबंधित पाप
भिकार्याशी तुच्छतेने बोलू नये. नुसते ‘नाही’ म्हणावे, नाहीतर त्याचे शाप बाधतात. भिकार्याने त्याला भीक न दिल्यामुळे शाप दिला, तर तो त्यालाच भोगावा लागतो.
५. प्रायश्चित्त घेण्यास सांगितलेली पातके
ज्या पातकांविषयी स्मार्त धर्मशास्त्रात प्रायश्चित्ते सांगितली आहेत, ती पुढीलप्रमाणे आहेत. श्रुतीस्मृतींतील पापांच्या सूचीत पुराणांनी पुढे पुष्कळ भर घातली.
अ. निषिद्ध गोष्टींचे आचरण
१. अभोज्यान्नसेवन (खाऊ नये ते खाणे, उदा. मांसभक्षण, मदिरापान), अशुची-अन्नसेवन (अपवित्र अन्न खाणे), श्राद्धान्नभोजन इत्यादी पाप.
२. निषिद्ध पदार्थांचा विक्रय, ऋणाचे निराकरण न करणे, काळ्या पैशात व्यवहार करणे इत्यादी पाप.
३. स्वार्थ : केवळ स्वतःचा विचार करणे, म्हणजे स्वार्थ. स्वार्थाला महापाप समजले जाते.
४. जुगार, खोटी साक्ष देणे, खोटा आरोप करणे, चौर्यकर्म (चोरी करणे) इत्यादी पाप करणे.
५. अगम्यागमन (परस्त्रीसमागम), व्यभिचार, कन्यादूषण (कन्येचे दोष), बलात्कार (बलात्कार करण्यात पाप आहे; मात्र वेश्येकडे जाण्यात पाप नाही; कारण ते एखादी वस्तू विकत घेतल्यासारखे आहे. त्यामुळे वासना वाढायला साहाय्य होते, हा त्यातील दोष आहे.), पशूगमन (पशूशी संबंध ठेवणे) इत्यादी.
६. हिंसा, गोहत्या, पशूहत्या, आत्महत्या इत्यादी पाप करणे.
७. शरणागताचा विश्वासघात करणे, हे अती उग्र पातक आहे.
आ. धार्मिक विधींच्या संदर्भातील पापे
१. परिवेदन (वडीलभावाच्या आधी लग्न करणे) इत्यादी
६. महानिर्वाण तंत्राप्रमाणे पापकारणे
अ. धर्मशास्त्राने निषिद्ध सांगितलेली कर्मे करणे
आ. धर्मशास्त्राने सांगितलेली कर्तव्ये पार न पाडणे
७. भ्रूणहत्येपेक्षा महाभयंकर पाप नसणे
‘भ्रूणहत्या हे महाभयंकर पाप आहे. यासंदर्भात अथर्ववेदात पुढील कथा आहे – `यज्ञात पशूहत्या होते. ‘त्या पशूहत्येचे पाप कोणाच्या माथी मारावे’, हे देवांना ठरवता येईना; म्हणून अग्नीने (अग्नीदेवाने) पाण्यात एका मागून एक तीन कोळसे टाकले. त्यातून एक, दि्वत आणि त्रित अशा तीन पुरुषांना उत्पन्न केले. त्यानंतर देवांनी त्या तिघांवर ते पाप लोटून दिले. त्या तिघांनी सूर्यास्ताच्या वेळी झोपणार्या माणसाच्या अंगावर ते पाप ढकलले. त्याने ते पाप जो दात घासत नाही, ज्याचे दात पिवळे आहेत, त्याच्यावर लोटले. त्याने थोरल्या बहिणीच्या आधी लहान बहिणीचे लग्न लावणार्यावर ते लोटले. त्याने ते मोठ्या भावाच्या आधी स्वतःचे लग्न करणार्यावर लोटले. त्याने ते मनुष्यवध करणार्यावर लोटले आणि त्याने ते गर्भपात घडवणार्यावर लोटून दिले. गर्भपात घडवणार्याच्या पलीकडे मात्र ते पाप लोटले जाईना !’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
८. पंचमहापातके
ब्रह्महत्या सुरापानं स्तेयं गुर्वङ्गनागमः ।
महानि्त पातकान्याहुः संसर्गश्चापि तैः सह ।। – मनुस्मृती ११.५३
अर्थ : ब्राह्मणाची हत्या करणे, सुरापान (दारू पिणे), चोरी करणे आणि गुरुपत्नीसमवेत संभोग करणे, ही महापातके होत आणि अशी महापातके करणार्यांच्या सहवासात रहाणे (भोजनादी संपर्क करणे), हे पाचवे महापातक होय.
अ. ब्रह्महत्या
मनुस्मृति सांगते, ‘आमेयी’ म्हणजे रजस्वला स्त्रीला मारणे, तसेच सोमयज्ञ (यज्ञ) करणार्या यजमानाच्या पत्नीचा वध करणे, ही पण ब्रह्महत्या आहे.
आ. सुरापान
‘पैष्टी’ नावाची सुरा प्राशन करणारे सवर्ण (ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य) महापातकी आहेत; परंतु सुरापान करणार्या शूद्राला मात्र पाप लागत नाही. त्याने सुरापान केले नाही, तर त्याला पुण्य मिळते.
इ. सुवर्णाची चोरी
सुवर्णाची चोरी करणे, हे तिसरे महापातक आहे. वरील पाचही महापातकांसाठी बहुधा मृत्यूदंडच सांगितलेला आहे.
९. छांदोग्य उपनिषदानुसार महापापे
ब्राह्मणाचा वध, गुरुपत्नीसमवेत संभोग, सोन्याची चोरी, ब्राह्मण असून दारू पिणे, गर्भहत्या ही महापापे होत आणि ही पापे करणार्यास साहाय्य करणारासुद्धा महापापी होतो.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘पुण्य-पाप आणि पापाचे प्रायश्चित्त’
या लेखाच्या दुसर्या भागात आपण दशविध पापे कोणती, पाप एकमेकांना भोगावे लागते, अशा कोणत्या जोड्या तसेच धर्मयुद्धापासून पाठ फिरवणे, मांस वापरून श्राद्ध करणे, देवता, गुरु आणि मंदिर यांच्या द्रव्याचे दान, अयोग्य व्यय आणि स्वाहाकार यांसारख्या कृतींमुळे लागणारे पाप यांविषयी पाहणार आहोत. तसेच युगानुसार मनुष्याचे पापी होण्याचे कारण, गतजन्मींच्या पापांचा या जन्मात होणारा परिणाम यांविषयीची माहिती पाहणार आहोत. यासाठी ‘पाप घडण्याची कारणे (भाग २)’ यावर क्लिक करा !