पू. (सौ.) अश्‍विनी पवार या छायाचित्रात इतरांपेक्षा पुष्कळ उठून आणि तेजस्वी दिसत असण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

‘सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्यात देवीतत्त्व जाणवते. पू. ताईचा तोंडवळा, डोळे, वाणी इत्यादींमधून दैवी चैतन्य प्रक्षेपित होत असते.प.पू. डॉक्टरांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला सेवेनिमित्त पू. ताईचा सहवास मिळत असतो. पू. ताईच्या सहवासात असतांना मला आध्यात्मिक त्रास होत असल्यास पू. ताईच्या चैतन्याने त्रास पुष्कळ लवकर उणावत असल्याचे बर्‍याचदा अनुभवायला मिळते.

छायाचित्र क्र. १. – डावीकडून कु. सोनाली गायकवाड (आताच्या सौ. लक्ष्मी पाटील),पू. (सौ.) अश्‍विनी पवार, सौ. स्नेहा हाके आणि सौ. पूजा गरुड ! (वर्ष २०२१)या छायाचित्रात अन्य साधिकांच्या तुलनेत पू. (सौ.) अश्‍विनी पवार अधिक उठून दिसत आहेत.

छायाचित्र क्र. २. : पू. (सौ.) अश्‍विनीताई यांनी नेसलेल्या साडीची रचना मंदिरातील देवीच्या मूर्तीला नेसवलेल्या साडीच्या रचनेप्रमाणे दिसत आहे.

१. पू. (सौ.) अश्‍विनीताई यांची कांती पुष्कळ तेजस्वी आणि प्रकाशमान दिसणे

अ. १५.१०.२०२१ या दिवशी दसरा होता. या दिवशी मला पू. ताईंमध्ये देवीतत्त्व अधिक प्रमाणात असल्याचे जाणवत होते. पू. ताईंची कांती पुष्कळ तेजस्वी आणि प्रकाशमान दिसत होती. ‘पू. ताईंच्या संपूर्ण देहातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.

आ. पू. ताईंचे एकटीचे छायाचित्र काढले होते, तसेच पू. ताईंसोबत आम्ही ३ साधिकांनी एकत्रित छायाचित्र काढले होते. (छायचित्र क्र. १ पहा) हे छायाचित्र पाहिले असता आम्हा सर्वांमध्ये पू. ताई पुष्कळ उठून आणि तेजस्वी दिसत होती. हा भेद सहजच लक्षात येत होता.

 

२. पू. (सौ.) अश्‍विनीताई यांनी नेसलेल्या
साडीची रचना देवीच्या मूर्तीला नेसवलेल्या साडीप्रमाणे दिसणे

७.१०.२०२१ या दिवशी घटस्थापना होती. त्या दिवशी आम्ही माझ्या भ्रमणभाषमध्ये पू. अश्‍विनीताईंचे छायाचित्र काढले. (छायचित्र क्र. २ पहा) हे छायाचित्र रामनाथी आश्रमातील साधिका सौ. प्रियांका राजहंस यांनी पाहिले. तेव्हा त्यांनी पू. अश्‍विनीताईंनी नेसलेल्या साडीची रचना मूर्ती रूपातील देवीला नेसवलेल्या साडीच्या रचनेप्रमाणे दिसत असल्याचे सांगितले. नंतर आम्ही पाहिले, तर खरंच मंदिरामधील देवीच्या मूर्तीला साडी नेसवल्यानंतर ज्याप्रमाणे साडीमध्ये देवी दिसते, तशीच पू. ताई दिसत होती. पू. ताईंमध्ये देवीचे तारक तत्त्व जाणवत होते.

 

कृतज्ञता आणि प्रार्थना

सौ. लक्ष्मी पाटील

हे गुरुमाऊली, तुमच्या कृपेने देवीचे चैतन्य प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळत आहे. यासाठी तुमच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘आम्हाला याचा लाभ करून घेण्यास पात्र बनवून तुमच्या चरणी समर्पित करून घ्या’, ही आर्त प्रार्थना !’

– सौ. लक्ष्मी नारायण पाटील (पूर्वाश्रमीच्या कु. सोनाली गायकवाड) (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) (वय ३१ वर्षेे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.४.२०२२)

 

‘पू. (सौ.) अश्‍विनी पवार या छायाचित्रात
इतरांपेक्षा पुष्कळ उठून आणि तेजस्वी दिसत असण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१० मध्ये ‘अश्‍विनी पवार या महर्लोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेल्या दैवी साधिका आहेत’, असे म्हटले होते. तेव्हा त्यांनी अश्‍विनी यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के घोषित केली होती. महर्लोकातून पृथ्वीवर धर्मकार्यासाठी जन्म घेतलेल्या जिवामध्ये अहं अल्प असतो, तसेच त्याच्यामध्ये भाव, साधनेची तळमळ आणि अंतर्मनात चालू असलेली साधना ही आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये उपजतच, म्हणजे जन्मतःच असतात. पुढे अश्‍विनी यांनी साधना करून वर्ष २०१७ मध्ये संतपद प्राप्त केले. संतपद प्राप्त केल्यानंतर साधनेत आणखी उन्नती होऊ लागल्यावर तो जीव ईश्‍वराशी हळू हळू एकरूप होऊ लागतो. त्याच्यात ईश्‍वराचे गुण अधिकाधिक येऊ लागतात. त्यामुळे अशा जिवातील चैतन्यात अधिकाधिक वृद्धी होऊ लागते, तसेच त्याच्यातील चैतन्य प्रक्षेपितही होऊ लागते. त्यामुळे अशा जिवाकडे पाहिल्यावर तो जीव तेजस्वी आणि प्रकाशमान दिसू लागतो. यामुळेच मागील वर्षीच्या (वर्ष २०२१ मधील) छायाचित्रात ‘पू. ताई इतरांपेक्षा पुष्कळ उठून आणि तेजस्वी दिसत असून त्यांच्या संपूर्ण देहातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे साधिकेला जाणवले आणि तिला अनुभूती आल्या.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., गोवा. (८.१०.२०२२)

आध्यात्मिक त्रास

याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment