- सत्पुरुषांच्या संकल्पामुळेच प्रतापगड आंदोलनाला यश !
- हिंदु समाजाचा दृष्टीकोन पालटणार्या सनातन संस्थेविषयी नितांत आदर !
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या कबरीचे अनधिकृत बांधकाम शासनाने हटवले. हा सत्याचा विजय आहे. डेरवण येथील संत सद्गुरु दिगंबरदास महाराज यांची इच्छा होती की, प्रतापगडाच्या पायथ्याला अफझलखानचे उदात्तीकरण नको. महाराजांचे शिष्य प.पू. अशोककाका जोशी यांनी ही गोष्ट मला सांगितली. यानंतर आम्ही आंदोलन उभारले. यामागे सत्पुरुषांचा संकल्प असल्याने तो यशस्वी झाला.
अधिवक्ता नितीन प्रधान यांचे मोलाचे सहकार्य !
यात विशेष उल्लेखनीय योगदान हे मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता नितीन प्रधान यांचे आहे. त्यांनी वर्ष २००४ ते २०१७ पर्यंत या कार्यासाठी सर्वतोपरी विनामूल्य योगदान दिले. त्यांचा पुष्कळ त्याग आहे. त्यांच्या चिरजिवांनीही आम्हाला साहाय्य केले. या कार्यासाठी सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे बहुमूल्य साहाय्य लाभले.
हिंदूंनी इच्छाशक्ती दाखवून सर्व गडदुर्ग शुद्ध आणि पवित्र करावेत !
शिंदे-फडणवीस शासनाची राजकीय इच्छाशक्ती आणि सुधीर मुनगंटीवार यांचे नियोजनकौशल्य यांमुळे हे कार्य पार पडले. आता आपण हिंदूंनीही इच्छाशक्ती दाखवून सर्व गडदुर्ग शुद्ध आणि पवित्र केले पाहिजेत.
हिंदु समाजाचा दृष्टीकोन पालटणार्या सनातन संस्थेविषयी नितांत आदर !
सनातन संस्थेने हिंदु समाजात गुणात्मक परिवर्तन केले आहे. सनातनच्या कार्याविषयी मला आदर आहे. सनातनच्या साधकांत धर्मनिष्ठा आहे. सनातनमुळे हिंदु समाजाचा दृष्टीकोन पालटला. अडगळीत पडलेल्या ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाचा उद्घोष करून सनातनने तो पुढे आणला. हिंदू देवाच्या उपासनेचा मार्ग विसरले होते. त्याचीही आठवण सनातनने करून दिली. त्यामुळे सनातनविषयी आम्हाला नितांत आदर आहे.