अनुक्रमणिका
‘जनन म्हणजे जन्म होणे. नवजात (नुकत्याच जन्मलेल्या) शिशूच्या संदर्भात दोष-निवारणासाठी केल्या जाणार्या धार्मिक विधीला ‘जननशांती’ म्हणतात. नवजात शिशूला अशुभ काळात जन्म झाल्यामुळे किंवा विशिष्ट परिस्थितीत जन्म झाल्यामुळे दोष लागतो. याविषयी अधिक माहिती या लेखाद्वारे समजून घेऊया.
१. अशुभ काळात जन्म झाल्यामुळे लागणारे दोष
पुढील सारणीत दिलेल्या योगांवर शिशूचा जन्म झाल्यास अशुभ काळासंबंधी दोष लागतो.
घटक | विवरण |
---|---|
१. तिथी | कृष्ण चतुर्दशी, अमावस्या आणि क्षयतिथी (टीप १) |
२. नक्षत्र | अश्विनी नक्षत्राची पहिली ४८ मिनिटे, पुष्य नक्षत्राचा दुसरा आणि तिसरा चरण, आश्लेषा नक्षत्र पूर्ण, मघा नक्षत्राचा प्रथम चरण, उत्तरा नक्षत्राचा प्रथम चरण, चित्रा नक्षत्राचा पहिला आणि दुसरा चरण, विशाखा नक्षत्राचा चतुर्थ चरण, ज्येष्ठा नक्षत्र पूर्ण, मूळ नक्षत्र पूर्ण, पूर्वाषाढा नक्षत्राचा तिसरा चरण आणि रेवती नक्षत्राची शेवटची ४८ मिनिटे |
३. योग | वैधृती आणि व्यतीपात |
४. करण | विष्टी (भद्रा) |
५. पर्वकाल | ग्रहण पर्वकाल (टीप २), सूर्यसंक्रमण पुण्यकाल (टीप ३) |
६. इतर योग | दग्धयोग, यमघंटयोग आणि मृत्युयोग (टीप ४) |
संदर्भ : दाते पंचांग
टीप १ – क्षयतिथी : ‘जी तिथी सूर्याेदयानंतर चालू होऊन दुसर्या दिवशीच्या सूर्याेदयापूर्वी संपते, म्हणजे कोणताच सूर्यादय पहात नाही’, अशा तिथीला ‘क्षयतिथी’ म्हणतात.
टीप २ – ग्रहण पर्वकाल : सूर्य किंवा चंद्र ग्रहणाचा काळ
टीप ३ – सूर्यसंक्रमण पुण्यकाल : सूर्य एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश करतो, तो काळ.
टीप ४ – दग्धयोग, यमघंटयोग आणि मृत्युयोग : तिथी, वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने निर्माण होणारे अशुभ योग
१ अ. अशुभ काळात जन्म झाल्यामुळे शिशूवर होणारे परिणाम
‘प्रारब्धानुसार ज्या जिवांना अधिक कष्टाचे प्रसंग भोगायचे असतात’, अशा जिवांचा जन्म अशुभ काळात होतो. अशा जिवांना विशिष्ट ग्रहांची शक्ती अल्प प्रमाणात ग्रहण होते. अशुभ काळात जन्म झालेल्या जिवावर त्याच्या प्रारब्धाच्या तीव्रतेनुसार विविध त्रास होतात. मंद प्रारब्ध असलेल्या जिवाचा जन्म अशुभ काळात झाल्यास त्याला पुनःपुन्हा ताप येणे, थकवा असणे, वाईट स्वप्ने पडणे आदी त्रास होतात. मध्यम प्रारब्ध असलेल्या जिवाचा जन्म अशुभ काळात झाल्यास त्याचे चालणे किंवा बोलणे उशिरा चालू होणे, बुद्धीशी निगडित त्रास होणे आदी त्रास होतात. तीव्र प्रारब्ध असलेल्या जिवाचा जन्म अशुभ काळात झाल्यास शिक्षण इत्यादीत उशिरा रुची निर्माण होणे किंवा न होणे, तरुण वयात विविध प्रकारची व्यसने लागणे, सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचा त्रास होणे आदी त्रास होतात. ज्योतिषशास्त्रात सांगितलेली जननशांती केल्यावर जिवाचे मंद आणि मध्यम प्रारब्ध काही प्रमाणात अल्प होते, तर तीव्र प्रारब्ध भोगण्यासाठी जिवाला ईश्वराकडून शक्ती मिळते.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२२)
२. विशिष्ट परिस्थितीत जन्म झाल्यामुळे लागणारे दोष
पुढील सारणीत दिलेल्या परिस्थितीत शिशूचा जन्म झाल्यास जननशांती केली जाते.
स्थिती | विवरण |
---|---|
१. यमल | म्हणजे जुळी संतती असणे |
२. एकनक्षत्र | भावंड, आई किंवा वडील यांचे आणि शिशूचे जन्मनक्षत्र एकच असणे |
३. त्रिकप्रसव | तीन मुलांनंतर मुलगी किंवा तीन मुलींनंतर मुलगा जन्मणे |
४. सदंत जन्म | शिशूला जन्मतः दात असणे |
५. विपरीत जन्म | अवयव चमत्कारिक, अल्प किंवा अधिक असणे |
संदर्भ : धर्मसिंधु
२ अ. विशिष्ट परिस्थितीत जन्म झाल्यावर जननशांती करावी लागण्यामागील कारण
‘प्रत्येक जिवाचे प्रारब्ध वेगवेगळे असते. काही जिवांच्या प्रारब्धाची तीव्रता (कष्टाचे प्रसंग) इतरांच्या तुलनेत अधिक असते. त्या जिवांचा जन्म विशिष्ट परिस्थितीत होतो. संतती ‘जुळी’ किंवा ‘एकनक्षत्र’ असणे हे तिचे कुटुंबियांतील संबंधित व्यक्तींशी देवाण-घेवाण संबंध अधिक असल्याचे दर्शक आहे. संतती ‘त्रिकप्रसव’ असणे हे कुटुंबात पूर्वजांचा त्रास असल्याचे दर्शक आहे. शिशूला जन्मतः दात असणे किंवा अवयव चमत्कारिक असणे हे त्याचे प्रारब्धचक्र गतीने चालू असल्याचे दर्शक आहे, म्हणजे जिवाला प्रारब्धभोग एकापाठोपाठ एक भोगावे लागतात. जन्मत: अवयव अल्प असणे हे जिवाच्या जीवनात दुःखाचे प्रसंग अधिक असल्याचे दर्शवते. या प्रकारचे खडतर प्रारब्ध सहन करण्यासाठी काळदेवतेची, म्हणजे ग्रहांची सकारात्मक शक्ती मिळावी’, यासाठी हिंदु धर्मात जननशांती करण्याचे उपाय योजले आहेत.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)
३. जननशांती विधी केल्यामुळे शिशूला होणारे लाभ !
पुढील सारणीत दिले आहेत.
सूक्ष्म स्तरावरील लाभ | लाभाचे प्रमाण (टक्के) | प्रत्यक्ष लाभ |
---|---|---|
१. शिशूला प्राणशक्ती मिळणे | ४० | अ. शिशूला विविध प्रकारचे रोग होणे; पण ते अल्प कालवधीत बरे होणे
आ. शिशूची वाढ अन्य मुलांप्रमाणे होणे, म्हणजे शिशू स्वस्थ रहाणे |
२. शिशूच्या भोवती ईश्वरी शक्तीचे सूक्ष्मकवच निर्माण होणे | ३० | अ. शिशूला अखंडित आणि व्यवस्थित झोप येणे, सक्तीने दूध किंवा आहार द्यावा न लागणे
आ. शिशूला पुनःपुन्हा वेगवेगळे त्रास न होणे |
३. प्रारब्धाची तीव्रता अल्प होणे | २० | अ. शिशूला त्रास झाल्यावर त्या संदर्भातील उपाय सांगणारे तज्ञ सहजतेने मिळणे
आ. शिशू मोठा झाल्यावर त्याला स्वतःला होणारे त्रास लक्षात येऊन त्यावर नियंत्रण मिळवता येणे |
४. अन्य (देवतांचे आशीर्वाद मिळणे, मन आणि बुद्धी यांवरील मायेचे आवरण लवकर दूर होणे इत्यादी) | १० | अ. शिशू अधिक आनंदी रहाणे
आ. सात्त्विक लोक, वस्तू किंवा ठिकाण यांकडे आकर्षित होणे |
एकूण | १०० |
जननशांती विधीतून वरील सारणीत दिलेले सर्वच लाभ शिशूला प्राप्त होतील, असे नाही. शिशूचे प्रारब्ध आणि भाव यांनुसार त्याच्यावर अल्प किंवा अधिक परिणाम होतो. गुरूंच्या आज्ञेनुसार किंवा चांगली आध्यात्मिक पातळी असलेल्या पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली भावपूर्ण आणि परिपूर्ण रितीने हे विधी करणे आवश्यक आहे. वर्तमान कलियुगात भावपूर्ण आणि परिपूर्ण विधी करणारे पुरोहित मिळणे पुष्कळ दुर्मिळ आहे. असे असले, तरी या विधीच्या माध्यमातून धर्मशास्त्रानुसार आचरण म्हणजेच साधना होत असल्याने त्याचे फळ जिवाला निश्चितच मिळते.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)
४. जन्म झाल्यानंतर किती दिवसांनी जननशांती करावी ?
शिशूचा जन्म झाल्यानंतर बाराव्या दिवशी जननशांती करावी. त्या दिवशी शांतीसाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. बाराव्या दिवशी जननशांती करणे शक्य नसल्यास शिशूच्या जन्मनक्षत्रात चंद्र येईल त्या दिवशी किंवा अन्य शुभ दिवशी मुहूर्त पाहून शांतीकर्म करावे. जननशांती अधिक विलंबाने केल्यास तिची परिणामकारकता अल्प होते. त्यामुळे ती वेळेत करणे लाभदायक आहे.’
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, गोवा. (२८.१०.२०२२)
Mala janan shanti baddal aata samjle. Maza mulga 7 varshch ahe tr ata keli tr chalen ka?
नमस्कार,
कोणत्या अशुभ योगावर जन्म आहे ?
अश्विनी नक्षत्र 1 चरण आहे..तर शांती करावी लागेल का?
नमस्कार,
मुलगा 7 वर्षांचा असल्याने शांती करण्याची आवश्यकता नाही.
खुपच छान , अभ्यासपुर्ण , मार्मिक माहिती !
मला काही प्रश्न विचारायचे आहे तुमची संस्था पुण्या मध्ये आहे का असेल तर पत्ता पाठवा
नमस्कार श्री. योगेशजी,
आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्या शंका तुम्ही [email protected] या इ-मेल पत्त्यावर पाठवू शकता किंवा http://www.Sanatan.org/sampark या लिंकवर माहिती भरल्यास साधक तुम्हाला संपर्क करतील.
आपली,
सनातन संस्था
Namaskar,
My son is born on Magha-4 (Moon in Leo at 10:57:33 degrees)
Is any ritual pooja required?
Does the ritual require Indian cow’s blessings (we are in the US at present), if so can it be done when we visit Bharat?
Gratitude,
Abhijit
Namaskar Shri. Abhijit ji,
Janan shanti is not required when Magh Nakshatra is in 4th phase.
Gratitude for the confirmation.
This is very informative article.
मला नक्षत्र व योग शांती साठीचे मंत्र असलेले पुस्तक हवे आहे, कोणते व कुठे मिळेल?
नमस्कार
आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.
याविषयी आपली शाखा, आपलं गृह्यसूत्र यानुसार वेदमंत्र वेगवेगळे असतात त्यामुळे आपले कुलपुरोहितांना विचारून आपण योग्य तो ग्रंथ घ्यावा अशी विनंती.
आपली
सनातन संस्था