हिंदु शब्द वैदिक आणि पौराणिक आहे ! – शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदु शब्द विदेशी असून त्याचा अर्थ खूपच घाणेरडा आहे, असे म्हटले होते. त्यावर सर्वच स्तरांवरून टीका होत आहे. त्यांनी वेगवेगळा संदर्भही देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने मात्र ‘ते जारकीहोळी यांचे वैयक्तिक विधान असून पक्षाशी त्याचा काही संबंध नाही’, असे सांगत हात झटकले आहेत. (जरी ते जारकीहोळी यांचे वैयक्तिक मत असले, तरी ते अयोग्य आहे, हे काँग्रेस ठामपणे का सांगत नाही ? त्यांनी किंवा अन्य कुणी काँग्रेसी नेत्याने अन्य धर्मियांच्या संदर्भात अशा प्रकारचे विधान केले असते, तर काँग्रेसने असेच उत्तर दिले असते कि त्याच्यावर कारवाई केली असती ?, हे काँग्रेसने सांगायला हवे ! – संपादक) या पार्श्वभूमीवर वर्ष २०१७ मध्ये पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी ‘हिंदु शब्द वैदिक आणि पौराणिक आहे’, असे स्पष्ट केले होते.

ख्रिस्ती आणि पैगंबर यांच्या आधीपासून हिंदु शब्दाचा उल्लेख !

शंकराचार्य यांनी म्हटले होते की, जर हिंदु शब्दाचा विचार केला, तर तो ख्रिस्त आणि पैगंबर यांच्या आधीपासून आहे. जेव्हा ॲलेक्झँडर भारतात आला होता, तेव्हा त्याने भारताला ‘सिंधुस्तान’ असे पुकारले होते. ‘हिंदु’ शब्दाचा उल्लेख पुराणांमध्येही आहे. अनेक प्राचीन ग्रंथ या शब्दाची पुष्टी करतात.

अंतत: ९ नोव्हेंबरच्या सायंकाळी जारकीहोळी यांनी हिंदूंच्या विरोधासमोर झुकत त्यांचे विधान मागे घेतले आहे.

Leave a Comment