सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचे वडील आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले विजय (नाना) वर्तक (वय ७७ वर्षे) यांचे निधन

विजय (नाना) वर्तक

नागोठणे (जिल्हा रायगड) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मामेभाऊ तथा सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचे वडील विजय (नाना) वर्तक (वय ७७ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांचे ९ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ७ वाजता नागोठणे येथील त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात् मुलगा श्री. अभय वर्तक, तसेच देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या स्नुषा सौ. रूपाली, कन्या सौ. श्रावणी फाटक, जावई श्री. कौस्तुभ फाटक, नातू श्री. योगेश्वर आणि नात कु. कल्याणी असा परिवार आहे. सनातन परिवार वर्तक आणि फाटक कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. नाना यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५.३० वाजता अंत्यसंस्कार केले.

 

१. नाना वर्तक यांना त्यांच्या सहकार्यांनी वाहिलेली श्रद्धांजली !

१. भावपूर्ण श्रद्धांजली ! सनातन धर्मासाठी सातत्याने कार्यरत असलेला एक समर्पित कार्यकर्ता आज आपल्यातून निघून गेला आहे. नाना सदैव स्मरणात रहातील ! – श्री. दिनेश परमार, नागोठणे (व्यापारी)

२. एका निष्ठावंत हिंदुत्वाची विचारसरणी स्वतःच्या जीवनात, संपूर्ण कुटुंबात, तसेच जनसामान्यांमध्ये रुजवण्यासाठी प्रसंगी संघर्षसुद्धा करणार्‍या अत्यंत सरळ स्वभावाच्या व्यक्तीमत्त्वाचा अंत झाला. मी स्वतः माझ्या सार्वजनिक जीवनात वर्तक कुटुंब आणि नाना यांचे योगदान कधीच विसरणार नाही. जय श्रीराम ।

– श्री किशोर जैन, रायगड जिल्हा सह संपर्क प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्म
झालेल्या खोलीचे नानांकडून भावपूर्णपणे जतन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान असलेले नागोठणे (रायगड) येथील घर हे विजय (नाना) वर्तक यांचे निवासस्थान होय. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्म झालेल्या खोलीचे नानांनी भावपूर्णपणे जतन केले आहे. नाना वर्तक हे वर्ष १९९२ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती राबवत असलेल्या विविध उपक्रमांमध्येही ते प्रासंगिक सहभागी होत असत. ते राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात दैनिक सनातन प्रभातमध्ये लिखाण करत असत.

Leave a Comment