१. श्री. प्रमोद फडते, चिंबल, गोवा
‘आश्रम पाहून ‘आपण आश्रमाला आतापेक्षा अधिक साहाय्य करायला हवे आणि आपल्या सर्व कुटुंबाला आश्रम दाखवावा’, मला असे वाटले.’ (१७.६.२०२२.)
२. श्री. सतीश व्यंकटराय भट, काणकोण, गोवा
‘आश्रम पाहून ‘हे खरेच ईश्वरी कार्य आहे’, असे मला वाटले. मला आश्रमात पुनःपुन्हा यायला आवडेल.’ (१७.६.२०२२)
३. श्री. मंगेश मधुकर पाटील (जिल्हाध्यक्ष, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), सिंधुदुर्ग
‘मला आश्रमात यायला मिळाले’, हे मी माझे भाग्य समजतो. हा आश्रम पाहून मला पुष्कळच आनंद झाला. आजचा दिवस माझ्या सदैव लक्षात राहील.’ (१७.६.२०२२)
४. श्री. प्रीतेश एन्.आर्. (अध्यक्ष, वन्दे मातरम् ट्रस्ट), चिक्कमगळुरू, कर्नाटक
अ. ‘रामनाथी आश्रमातील वातावरण दैवी आहे.
आ. मी ध्यानमंदिरात असतांना माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले.’
५. अधिवक्ता शैलेंद्र गोपी नाईक, अडपई, गोवा.
अ. ‘रामनाथी आश्रमात आल्यानंतर प्रत्येक वेळी अधिकाधिक शिकण्याची आणि आश्रम पहाण्याची माझी जिज्ञासा वाढते. प्रत्येक वेळी येथील ऊर्जा वाढलेली असते.
आ. ‘मी मंदिरात आलो असून येथे अधिक वेळ थांबावे’, असे मला वाटते.’ (१७.६.२०२२)
६. श्री. पद्मनाभ होळ्ळा, बेंगळुरू
‘आश्रमातील वातावरण आल्हाददायक आहे. असे समाजात कुठेही पहायला मिळत नाही. येथे सर्वत्र आनंद आहे. येथील साधकांचे वागणे सात्त्विक आहे. नामसंकीर्तनाची एक वेगळीच शक्ती आहे, जिला कोणत्याही भाषेची मर्यादा नाही. त्या शक्तीचा उपयोग करून आपण मोक्षप्राप्ती करू शकतो.’ (२६.१२.२०१९)
७. अधिवक्ता शिवानंद एम्. बण्णूर, गोकाक, बेळगाव, कर्नाटक
‘आश्रमात आल्यानंतर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात पुष्कळ शिकायला मिळाले. आश्रमात मला राष्ट्रीय एकात्मता जाणवली, जी बाहेर समाजात जाणवत नाही.’ (२६.१२.२०१९)
८. श्री. आदित्यकुमार एच्.आर्., बेंगळुरू
‘सनातन आश्रम हे आध्यात्मिक गुरूंचे घर आहे. येथील आध्यात्मिक ज्ञान आणि मार्गदर्शन अवर्णनीय आहे.’ (२६.१२.२०१९)
९. श्री. प्रवीण क. डोंगरे, जायंटस ग्रुप, कर्ला, रत्नागिरी
‘आश्रम पाहून मी हिंदू असल्याचा मला अभिमान वाटला.’ (१७.६.२०२२)
१०. श्री. धनाजी रामचंद्र मोहिते (अध्यक्ष, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन), तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग
‘आश्रमात आल्यानंतर माझ्यात आपोआपच सात्त्विक भाव निर्माण झाला, तसेच माझ्या अंगात आपोआपच एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. येथील साधकांची सेवाभावी वृत्ती पाहून मी प्रभावित झालो.’ (१७.६.२०२२)
११. श्री. सूरज इम्रतलाल रवे, भिंगार, नगर
‘मला आश्रमातील सात्त्विकता आणि पवित्रता प्रकर्षाने जाणवली. आश्रमाचे संशोधनकार्य समाजासाठी पुष्कळच लाभदायी आहे.’ (१७.६.२०२२)
‘सूक्ष्म जगताचे प्रदर्शन’ पाहून दिलेले अभिप्राय
१. श्री. आदित्यकुमार एच्.आर्., बेंगळुरू
‘सूक्ष्म जगताच्या प्रदर्शनामध्ये संग्रहित केलेल्या समकालीन वस्तूंचे संशोधन करून त्याचे आध्यात्मिक दृष्टीकोनातून विश्लेषण केले आहे.’ (२६.१२.२०१९)
२. अधिवक्ता शिवानंद एम्. बण्णूर, गोकाक, बेळगाव, कर्नाटक
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांमध्ये झालेले नैसर्गिक पालट पहायला मिळाले. साधकांवर होत असलेले वाईट शक्तींचे आक्रमण आणि त्यांवरील उपाय अनुभवता आले.’ (२६.१२.२०१९)
३. डॉ. आय. राजलक्ष्मी, भाग्यनगर
‘चांगली आणि वाईट शक्ती अन् त्यांच्यात होत असलेले सूक्ष्म युद्ध याविषयी समजले.’ (२६.१२.२०१९)
४. श्री. सतीश व्यंकटराय भट, काणकोण, गोवा
‘ज्यांना जाणिवेच्या पलीकडील (सूक्ष्मातील) जग पहाता येते, ते धन्य आहेत. हा प्रयोग सर्वांनी अनुभवण्यासारखा आहे.’ (१७.६.२०२२)
५. श्री. धनाजी रामचंद्र मोहिते (अध्यक्ष, कॉन्टॅ्रक्टर असोसिएशन), तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग
‘प्रदर्शन पाहून सूक्ष्म जगताचा अनुभव प्राप्त करण्याविषयी माझ्या मनात एक प्रकारची आस्था निर्माण झाली.’ (१७.६.२०२२)
६. श्री. प्रवीण क. डोंगरे, जायंटस ग्रुप, कर्ला, रत्नागिरी
‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन’, ही सर्व गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या पुराव्यासहित सिद्ध करण्याची फार चांगली योजना आहे.’ (१७.६.२०२२)