रामनाथी (गोवा) – संगमेश्वर (जिल्हा रत्नागिरी) येथील सुप्रसिद्ध ‘रेकी मास्टर’ आणि ‘रेकी विद्यानिकेतन’चे संस्थापक तथा ओझरे येथील ‘ब्रह्मकमल आश्रमा’चे संस्थापक श्री. अजित तेलंग यांनी १० ऑक्टोबर या दिवशी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. सनातनचे साधक श्री. अभिजीत सावंत यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म, आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. या वेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता तथा ‘रामनाथ देवस्थान’चे माजी अध्यक्ष डॉ. राजन कुंकळ्ळेकर, श्री. अजित तेलंग यांची मुलगी रेकी मास्टर सुश्री अश्विनी तेलंग, त्यांची विद्यार्थिनी रेकी मास्टर सुश्री कृपा चोक्सी आणि श्री. गीते हेही उपस्थित होते.
आश्रमात चालणार्या कार्याविषयी कौतुक करतांना श्री. अजित तेलंग म्हणाले, ‘‘येथे चालणारे कार्य पुष्कळ छान आहे. आश्रम पाहून मला आनंद झाला.’’ सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ते म्हणाले, ‘‘हे प्रदर्शन पुष्कळ उद्बोधक आणि ज्ञानवर्धक आहे. सूक्ष्म जगत्, अध्यात्म, संस्कृती आदी विषय तरुण पिढीपर्यंत पोचणे आवश्यक आहे.’’ महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने होत असलेल्या विविध विषयांच्या संशोधनाविषयी त्यांनी जिज्ञासेने जाणून घेतले, तसेच संशोधनासाठी काही विषयही त्यांनी सुचवले. श्री. तेलंग यांनी स्वतः केलेल्या काही प्रयोगांची माहिती दिली.
आश्रमातील व्यवस्था पहातांना ‘येथे प्रत्येक गोष्टीमध्ये इतरांचा किती बारीक विचार केला जातो’, असे ते त्यांच्या विद्यार्थिनींना म्हणाले. तसेच उदाहरणादाखल त्यांनी आश्रमातील काही व्यवस्थांच्या मागील उद्देशही समाजावून सांगितला. श्री. तेलंग यांच्या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक १५ दिवसांनी लोकांना संस्कृती आणि अध्यात्म यांविषयी माहिती व्हावी या दृष्टीने पालक अन् विद्यार्थी यांच्यासाठी चालू असलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांत प्रबोधन करण्यासाठी सनातन संस्थेला त्यांनी निमंत्रण दिले.
अन्य मान्यवरांनी आश्रमाविषयी दिलेले अभिप्राय
१. डॉ. राजन कुंकळ्ळेकर : आश्रम पुष्कळ छान आहे. येथील व्यवस्थाही उत्तम आहे. साधक अत्यंत अगत्यशील आहेत. आश्रम पहातांना चांगली माहिती मिळाली. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन प्रभावशाली आणि ज्ञानात भर पाडणारे आहे.
२. ‘रेकी मास्टर’ सुश्री अश्विनी तेलंग : आश्रमातील वातावरण छान आणि प्रसन्न आहे. समाजापर्यंत विशेषतः तरुणांपर्यंत सूक्ष्म जगताविषयीची माहिती पोचायला हवी.
३. ‘रेकी मास्टर’ सुश्री कृपा चोक्सी : आश्रमात सकारात्मक स्पंदने जाणवली, तसेच आश्रमात शिकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन विस्मयकारक आहे. येथे मी जे अनुभवले, त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली.