‘सनातन संस्थेच्या ॲप’वरील ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या सदरात सांगितल्याप्रमाणे ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप केवळ अर्धा घंटा करूनही पित्ताचा त्रास समूळ दूर होणे

 

१. पित्ताचा त्रास होत असल्याने कार्यालयातील कामे
करण्यावर बंधने येणे आणि औषधोपचार करूनही परिणाम न होणे

‘मला काही दिवसांपूर्वी पित्ताचा त्रास होत होता. ‘सतत होणारी घशातील जळजळ आणि डोकेदुखी’ यांमुळे मी पथ्य पाळू लागलो. नंतर मला याचा तीव्र त्रास होऊ लागला. मला कार्यालयातील कामे करण्यावर बंधने येऊ लागली. त्यामुळे मी आयुर्वेदिक उपचार घेण्याचे ठरवले. मी प्रतिदिन दुधातून लघू सूतशेखर घेऊ लागलो. तीन – चार दिवस औषध घेऊनही काहीच गुण न आल्याने मी औषध घेणे थांबवले. त्यानंतर काही दिवस असेच गेले.

 

२. ‘सनातन ॲप’वरील ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या सदरात
पित्ताच्या त्रासाच्या निवारणासाठी सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा
नामजप केल्यावर घशात होणारी जळजळ दूर होणे आणि प्रवासातही पित्ताचा त्रास न होणे

एक दिवस मी भ्रमणभाषवर अन्य काही पहात असतांना मला ‘सनातन ॲप’वर ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या सदरामध्ये पित्ताच्या त्रासाच्या निवारणासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करावा’, असे वाचनात आले. तेव्हा मी लगेच न्यास करून तो नामजप करायला आरंभ केला. आश्चर्य म्हणजे मी केवळ १५ मिनिटे नामजप केल्यावर माझ्या घशात होणारी जळजळ दूर झाली. त्यानंतर मी आणखी १५ मिनिटे नामजप केला. त्यानंतर माझा त्रास पूर्ण नाहीसा झाला.

अनुमाने १ आठवड्याने मी पुष्कळ प्रवास केला. पूर्वी मला प्रवासात असतांना पित्ताचा त्रास व्हायचा. या वेळी प्रवासात मला पित्ताचा त्रास झाला नाही. मला पथ्यही पाळावे लागत नाही.

कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. सागर प्रकाश जोशी, हिंजवडी, पुणे. (९.७.२०२२)

Sanatan Chaitanyavani Audio App : https://Sanatan.org/Chaitanyavani

Sanatan Sanstha Android : https://www.sanatan.org/android

Sanatan Sanstha iOS : https://www.sanatan.org/ios

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment