अनुक्रमणिका
- १. सप्तदेवतांची तत्त्वे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून कार्यरत होणे
- १ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विश्वव्यापी कार्य करण्यासाठी सप्तदेवतांची तत्त्वे इच्छा, क्रिया आणि ज्ञान या तीन स्तरांवर कार्यरत होणे
- १ आ. सप्तदेवतांची तत्त्वे श्रीविष्णूच्या धर्मसंस्थापनेच्या कार्याला साहाय्य करण्यासाठी विविध प्रकारच्या तेजाच्या रूपांत प्रकट होऊन कार्यरत होणे
- १ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून विविध योगमार्गांनुसार साधना करणार्या साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी सप्तदेवतांची तत्त्वे कार्यरत होणे
- १ ई. सनातन संस्था आणि तिच्याशी संबंधित असणार्या संस्था यांचे साधक धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी असल्यामुळे साधक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी सप्तदेवतांची तत्त्वे कार्यरत होणे
- १ उ. १४ विद्या, ६४ कला आणि ६ शास्त्रे यांच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सप्तदेवतांची तत्त्वे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून कार्यरत झालेली असणे
- २. सप्तरंगांशी संबंधित असणारी सप्तदेवतांची तत्त्वे, त्यांचा आविष्कार आणि त्यांचे सूक्ष्म स्तरावर होणारे कार्य
‘रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वास्तव्य केलेल्या खोलीमध्ये आगाशीच्या दाराच्या झरोक्यातून पश्चिमेकडील भिंतीवर प्रकाश पडतो. या प्रकाशामुळे भिंतीवर सप्तरंग दिसून येतात. त्याची २४.३.२०२१ या दिवशी छायाचित्रे काढण्यात आली. भिंतीवर सप्तरंग दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
१. सप्तदेवतांची तत्त्वे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून कार्यरत होणे
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विश्वव्यापी कार्य करण्यासाठी
सप्तदेवतांची तत्त्वे इच्छा, क्रिया आणि ज्ञान या तीन स्तरांवर कार्यरत होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘विश्वगुरु’ आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये विश्वातील समस्त दैवी शक्ती आणि सप्तदेवतांची तत्त्वे आवश्यकतेनुसार प्रकट होऊन इच्छा, क्रिया आणि ज्ञान या तीन स्तरांवर कार्यरत होतात.
१ अ १. विविध प्रकारच्या शक्तींशी संबंधित असणार्या रंगछटा
१ आ. सप्तदेवतांची तत्त्वे श्रीविष्णूच्या धर्मसंस्थापनेच्या
कार्याला साहाय्य करण्यासाठी विविध प्रकारच्या तेजाच्या रूपांत प्रकट होऊन कार्यरत होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘धर्मगुरु’ आहेत. पृथ्वीवर स्थुलातून आणि सूक्ष्मातून हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून श्रीविष्णूचे अवतारी तत्त्व कार्यरत होते. या अवतारी कार्याची पूर्तता करण्यासाठी सनातन संस्था आणि तिच्याशी संलग्न असणार्या संस्थांतील साधकांना सप्तदेवतांचे कृपाशीर्वाद मिळतात. त्यामुळे धर्मप्रसार आणि धर्मसंस्थापना ही कार्ये करत असतांना विष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांना सप्तदेवतांचा पाठिंबा लाभतो आणि त्यांच्या तत्त्वलहरी सनातनच्या आश्रमात, सेवाकेंद्रात आणि जेथे जेथे धर्मकार्य चालते, तेथे तेथे आशीर्वाद स्वरूपात कार्यरत होतात. देवतांच्या या तत्त्वलहरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये आवश्यकतेनुसार विविध प्रकारच्या तेजाच्या स्वरूपात प्रगट होऊन कार्यरत होतात.
१ आ १. विविध प्रकारच्या तेजांचा रंग
१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून विविध योगमार्गांनुसार
साधना करणार्या साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी सप्तदेवतांची तत्त्वे कार्यरत होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले मोक्षगुरु आहेत. त्यामुळे ते साधकांना त्यांच्या योगमार्गानुसार व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील साधना करण्यासाठी मार्गदर्शन करतात. तेव्हा परात्पर गुरुदेवांच्या माध्यमातून सप्तदेवतांच्या तत्त्वलहरी कार्यरत होऊन साधकांची विशिष्ट योगमार्गानुसार आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी साहाय्य करतात.
१ इ १. विविध योगमार्गांशी संबंधित असणार्या देवता आणि त्यांचा सूक्ष्म रंग
१ ई. सनातन संस्था आणि तिच्याशी संबंधित असणार्या
संस्था यांचे साधक धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी असल्यामुळे
साधक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी सप्तदेवतांची तत्त्वे कार्यरत होणे
सनातन संस्था आणि तिच्याशी संबंधित असणार्या संस्था यांचे साधक धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी असल्यामुळे साधक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पाताळातील मोठ्या वाईट शक्ती सूक्ष्मातून आक्रमणे करतात. त्यांचे वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी सप्तदेवतांची तत्त्वे सनातनचे पृथ्वीवरील विविध आश्रम, सेवाकेंद्रे आणि साधकांची घरे येथे कार्यरत होऊन त्यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या मारक शक्तीमुळे वाईट शक्तींचा नाश होऊन साधकांचे रक्षण होते.
१ उ. १४ विद्या, ६४ कला आणि ६ शास्त्रे यांच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी
सप्तदेवतांची तत्त्वे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून कार्यरत झालेली असणे
सनातन संस्था आणि तिच्याशी संबंधित असणार्या संस्था यांचे साधक यांना १४ विद्या, ६४ कला आणि ६ शास्त्रे यांच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सप्तदेवतांची तत्त्वे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून कार्यरत झाली आहेत. त्यामुळे विविध कला आणि विद्या यांची जोपासना होऊन कलाकार साधकांची कलेच्या माध्यमातून साधना होऊन त्यांची वाटचाल ईश्वरप्राप्तीच्या दिशेने चालू आहे.
२. सप्तरंगांशी संबंधित असणारी सप्तदेवतांची तत्त्वे,
त्यांचा आविष्कार आणि त्यांचे सूक्ष्म स्तरावर होणारे कार्य
जेव्हा सप्तदेवतांच्या तत्त्वलहरी परात्पर गुरुदेवांच्या देहामध्ये कार्यरत होतात, तेव्हा त्यांच्या देहातील त्वचा, केस आणि नखे यांच्यामध्ये दैवी पालट होऊन त्यांच्यावर विविध रंगांच्या छटा येतात.
त्याचप्रमाणे जेव्हा देवतांच्या तत्त्वलहरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रहात्या खोलीत कार्यरत होतात, तेव्हा त्यांच्या खोलीतील भिंतींवर विविध रंगांच्या छटा दिसतात. जेव्हा ब्रह्मांडातून परात्पर गुरुदेवांच्या खोलीत विविध देवतांच्या लहरी येतात, तेव्हा त्यांच्या खोलीत विविध रंगांचे प्रकाशझोत किंवा प्रकाशकिरण येतांना दिसतात. सप्तरंगांमध्ये तांबूस, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा हे सात रंग कार्यरत असतात. या सप्तरंगांशी संबंधित देवतांची तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत.
२ अ. सप्तरंगांच्या छटांच्या माध्यमातून कार्यरत असणारी सप्तदेवतांची तत्त्वे
कृतज्ञता
अशाप्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रहात्या खोलीमध्ये सप्तदेवतांच्या तत्त्वलहरी कार्यरत झाल्यामुळे त्यांच्या रहात्या खोलीमध्ये आगाशीच्या दाराच्या झरोक्यातून खोलीत येणार्या प्रकाशामधून पश्चिमेकडील भिंतीवर सप्तरंग दिसतात. यावरून परात्पर गुरुदेवांचे कार्य किती अवतारी आणि दिव्य स्वरूपांचे आहे अन् या कार्याला ब्रह्मांडातील समस्त दैवी शक्ती साहाय्य करतात, याची प्रचीती आपल्याला येते. यासाठी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०२२)
वाईट शक्तीवातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. सूक्ष्मव्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |