मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. राजेश पारधी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. सनातन आश्रमाच्या परिसरात प्रवेश करतांना ‘स्वतःमध्ये एक वेगळीच ऊर्जा प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले.

२. आश्रम पहतांना सहजपणे न कळणार्‍या आणि नवनवीन गोष्टींची मला जाणीव होत होती. काही ठिकाणी मंद असा सूक्ष्म स्पर्शपण मला जाणवत होता.

३. खरेतर कुठलाही पर्यवेक्षक (सुपरवायझर) नसलेली पहिलीच संस्था मला बघायला मिळाली. इथे प्रत्येक जण चाकोरीत नसतांनाही दायित्व घेऊन सेवा करतांना दिसतो.

४. मी सनातनच्या कार्याविषयी ऐकून होतो; पण आश्रम बघून सनातनचे कार्य जाणून घेतले, तेव्हा ‘सनातनचे कार्य विशाल आणि अवर्णनीय आहे’, असे माझ्या लक्षात आले. याचे वर्णन करायला मी पामर आहे.

५. या प्रसंगी ‘आपल्या सभोवती अनेक गोष्टी असतात; पण त्याकडे आपण सहज दुर्लक्ष करत असतो’, याची जाणीव झाली.

६. मी छायाचित्रकार आहे. आश्रमाच्या कार्याला माझे काही साहाय्य हवे असल्यास कळवावे.

– श्री. राजेश सखाराम पारधी, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग.

(१५.१२.२०१९)

Leave a Comment