|
पुणे – जुलै ते सप्टेंबर २०२२ या काळातील भविष्यकथनात ‘ग्रहस्थितीचा विचार करता सप्टेंबर मासात अतीवृष्टी किंवा पूर यांच्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत होईल, तसेच अतीवृष्टी किंवा भूकंप याच्यामुळे हानी होऊ शकते, असे भाकीत येथील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी आधीच केले होते. प्रत्यक्षातही ते खरे ठरले; कारण १८ सप्टेंबर या दिवशी तैवानमध्ये झालेला मोठा भूकंप, तसेच ठिकठिकाणी झालेली अतीवृष्टी आणि पुणे येथे मध्यंतरी झालेली ढगफुटी यांमुळे जनजीवन विस्कळीत होऊन प्रचंड हानी झाली.