‘आपल्या जठरामध्ये पाचक स्राव स्रवत असतात. हे पाचक स्राव अन्ननलिकेत आले, तर पित्ताचा त्रास होतो. आंबट, खारट, तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पित्त वाढते; परंतु असे काही न खातासुद्धा काही जणांना घशात आणि छातीत जळजळण्याचा त्रास, म्हणजेच पित्ताचा त्रास होतो. बहुतेक वेळा यामागे बद्धकोष्ठता हे कारण असते. बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी उपचार केल्यास हा त्रास लगेच न्यून होतो. पुढील प्राथमिक उपचार करून पहावेत.
‘गंधर्व हरीतकी वटी’ या औषधाच्या २ ते ४ गोळ्या रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह घ्याव्यात. बद्धकोष्ठतेसह भूक न लागणे, जेवण न जाणे, अपचन होणे, पोटात वायू (गॅस) होणे ही लक्षणे असल्यास ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या दोन्ही वेळच्या जेवणाच्या १५ मिनिटे आधी चघळून खाव्यात. याने पाचक स्राव चांगल्या प्रकारे निर्माण होतात. बद्धकोष्ठतेवरील हे उपचार १५ दिवस करावेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०२२)