प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. जीजी यांच्या (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांच्या अस्थींचे नर्मदा नदीमध्ये विसर्जन

Article also available in :

मोरटक्का (मध्यप्रदेश) – प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांच्या अस्थी २२ सप्टेंबर २०२२ या दिवशी खेडीधार (मोरटक्का) येथे नर्मदा नदीत त्यांचे ज्येष्ठ पुत्र पू. नंदू (हेमंत) कसरेकर यांच्या हस्ते विसर्जित करण्यात आल्या.

या प्रसंगी प.पू. रामानंद महाराज यांचे पुत्र लोकेश (राजू) निरगुडकर, तसेच श्री. राजू निकम, ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदौर’चे अध्यक्ष श्री. शरद बापट, कोषाध्यक्ष श्री. विजय मेंढे, विश्वस्त श्री. रवींद्र कर्पे, तसेच श्री. गणेश जोशी, सौ. चित्रा मेंढे, सौ. वर्षा कर्पे, सौ. शिल्पा निरगुडकर आणि अनेक भक्त या वेळी उपस्थित होते.


प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी
प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर)
यांच्या पार्थिव देहावर श्री क्षेत्र कांदळी (पुणे) येथे अंत्यसंस्कार !

पुणे – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी आणि पू. नंदू (हेमंत) कसरेकर यांच्या मातोश्री वात्सल्यमूर्ती प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर, वय ८६ वर्षे) यांनी नाशिक येथे त्यांचे धाकटे सुपुत्र श्री. रवींद्र कसरेकर यांच्या घरी देहत्याग केला. त्यानंतर त्यांचे पार्थिव पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र कांदळी येथे आणण्यात आले होते. श्री क्षेत्र कांदळी येथील स्मशानभूमीत प.पू. जीजी यांच्या पार्थिव देहावर १९ सप्टेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता श्री. रवींद्र कसरेकर (प.पू. जीजी यांचे तृतीय पुत्र) यांनी अग्नीसंस्कार केला.

प.पू. जीजी यांचे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले पार्थिव

या वेळी प.पू. जीजी यांचे मोठे सुपुत्र पू. नंदू कसरेकर, मधले सुपुत्र श्री. सुनील कसरेकर, धाकटे सुपुत्र श्री. रवींद्र कसरेकर, मुलगी (श्रीमती) मिनाताई खोडके, जावई श्री. जयंत रामचंद्र पळशीकर (मृत मुलगी कै. (सौ.) नर्मदा यांचे पती), मोठ्या स्नुषा सौ. स्मिता हेमंत कसरेकर, मधल्या स्नुषा सौ. नयना सुनील कसरेकर आणि धाकट्या स्नुषा सौ. नीलिमा रवींद्र कसरेकर, तसेच कु. दीपाली, कु. वैभवी, चि. सोहम्,  कु. रेवा, विपुल आणि विशाल ही नातवंडे उपस्थित होती.

१. ‘ॐ’चा उच्चार करून प.पू. जीजींचा देहत्याग

न्यूमोनिया झाल्यामुळे प.पू. जीजींना नाशिक येथे रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना श्री. रवींद्र कसरेकर यांच्या घरी आणण्यात आले होते. १८ सप्टेंबर या दिवशी दुपारी २ वाजता अचानक ‘ॐ’चा उच्चार करून त्यांनी देहत्याग केला.

२. उपस्थित संत आणि मान्यवर

या वेळी ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदौर’चे विश्वस्त श्री. रवींद्र दत्तात्रय कर्पे, ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र भवरासकर, डोंबिवली येथील प.पू. गोखले महाराज, डॉ. (सौ.) कुंदाताई जयंत आठवले, नारायणगाव येथील प.पू. शशिकांत ठुसे, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त श्री. अशोक काशिनाथ भांड हे उपस्थित होते.

३. क्षणचित्रे

अ. प.पू. जीजींच्या पार्थिव देहाच्या दर्शनासाठी शेकडो भक्त श्री क्षेत्र कांदळी येथे आले होते. कांदळी येथे मध्यरात्रीपासून प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचा कार्यक्रम चालू होता.

आ. प.पू. जीजींचे पार्थिव उचलतांना ‘हरि ॐ तत्सत् ।’ असा नामजप करण्यात आला.

इ. अंत्यसंस्कार झाल्यानंतर वातावरणात शांतता आणि चैतन्य जाणवत होते.


प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी वात्सल्यमूर्ती
प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांचा देहत्याग !

प.पू. भक्तराज महाराज
प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर

नाशिक – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) धर्मपत्नी आणि पू. नंदू कसरेकर यांच्या मातोश्री प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) (वय ८६ वर्षे) यांनी १८ सप्टेंबर या दिवशी दुपारी २ वाजता नाशिक येथे त्यांचे धाकटे सुपुत्र श्री. रवींद्र कसरेकर यांच्या घरी देहत्याग केला. प.पू. जीजी म्हणजे वात्सल्यभावाचे मूर्तीमंत उदाहरणच होत्या. प.पू. बाबांच्या सर्व भक्तांना त्यांनी वात्सल्याने जोडून ठेवले होते.

प.पू. जीजींच्या पश्चात त्यांचे मोठे सुपुत्र पू. नंदू (हेमंत) कसरेकर, मधले सुपुत्र श्री. सुनील कसरेकर, धाकटे सुपुत्र श्री. रवींद्र कसरेकर, तर मोठ्या स्नुषा सौ. स्मिता हेमंत कसरेकर, मधल्या स्नुषा सौ. नयना सुनील कसरेकर आणि धाकट्या स्नुषा सौ. नीलिमा रवींद्र कसरेकर, तसेच कु. दीपाली, कु. वैभवी, चि. सोहम् आणि कु. रेवा ही नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार कसरेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

प.पू. जीजी यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार श्री क्षेत्र कांदळी (वडगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) येथे १९ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता होणार आहेत.

 

सनातनच्या कार्याला भरभरून आशीर्वाद देणार्‍या
प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. (कै.) सुशीला दिनकर कसरेकर !

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात संवाद साधतांना प.पू. जीजी आणि डॉ. जयंत आठवले (२.६.२०१४)

‘भजन’, ‘भ्रमण’ आणि ‘भंडारा’ या तिन्ही माध्यमांतून अहोरात्र कार्य करणारे आमचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर (प.पू. जीजी) यांनी आज देहत्याग केला. वयाच्या १७ व्या वर्षी विवाह झाल्यानंतर त्यांनी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्यासारख्या उच्च कोटीच्या संतांचा संसार सांभाळण्याचे अवघड शिवधनुष्य आयुष्यभर पेलले.

प.पू. जीजी यांची साधना अत्यंत खडतर होती. जगदोद्धाराचे व्रत घेतलेल्या प.पू. बाबांचे संसाराकडे पूर्ण दुर्लक्ष होत असतांना प.पू. जीजींनी मोठ्या धैर्याने आपला संसार केला. पुष्कळ कष्ट केले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना वाढवले.

अशा स्थितीतही त्या सर्व शिष्यांवर पुष्कळ प्रेम करत. आम्हाला त्यांचा प्रेमळ सहवास अनेक वर्षे लाभला. प.पू. बाबांच्या सर्व भक्तांना त्यांनी वात्सल्यभावाने जोडून ठेवले होते. प.पू. जीजींसारख्या थोर गुरुमाता आम्हाला लाभल्या, ही प.पू. बाबांचीच कृपा आहे. सनातनला जसे प.पू. बाबांचे आशीर्वाद लाभले, तसे प.पू. जीजींचेही आशीर्वाद लाभले. अनेकदा त्या सनातनच्या आश्रमांत आल्या आहेत आणि त्यांनी साधकांचे कौतुक करून त्यांना भरभरून आशीर्वादही दिले आहेत. त्यांच्या कृपाछत्राखाली सनातनचे कार्य दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहे.

आता त्यांचा स्थुलातील सहवास लाभणार नाही; पण त्यांच्या प्रेमळ आठवणी नेहमीच स्मरणात रहातील.

या थोर गुरुमातेच्या चरणी शतशः प्रणाम आणि कृतज्ञता !

– डॉ. जयंत आठवले (१८.९.२०२२)

Leave a Comment