१. स्तोत्रे आणि भजने सुरात अन् भावपूर्ण म्हणणारी कु. कनिष्का (वय ९ वर्षे) !
एकदा तमिळ बालसंस्कार वर्गाच्या आरंभी तिसर्या इयत्तेत शिकणार्या कु. कनिष्काने (वय ९ वर्षे) एक भजन म्हटले. तिने भजन लयीत, सुरात आणि तालात भावविभोर होऊन म्हटले. त्या वेळी माझा भाव जागृत झाला. तिला अनेक स्तोत्रे मुखोद्गत आहेत. ती स्तोत्रे आणि भजने सुरात अन् भावपूर्ण म्हणते.
२. बालसंस्कारवर्गात उपस्थित राहिल्यापासून
स्वयंशिस्त अंगी बाणवणारा कु. साई बालाजी (वय १२ वर्षे ) !
ऑनलाईन’ सत्संगात उपस्थित असणार्या जिज्ञासूंचा मुलगा कु. साई बालाजी (वय १२ वर्षे) सातव्या इयत्तेत शिकत आहे. तो बालसंस्कारवर्गात यायला लागल्यापासून त्याच्यात पुष्कळ सकारात्मक पालट दिसून येतात. त्याचे वडील श्री. नंदकुमार यांनी सांगितले, ‘‘साई बालाजी आधीपासूनच सकारात्मक आहे. तो बालसंस्कार वर्गात जाऊ लागल्यापासून त्याच्यात आणखी शिस्तबद्धता आली आहे. तो नियमितपणे नामजप आणि त्याच्या परीने सेवा करतो. तो पुष्कळ शांत झाला आहे.’’
३. ‘सर्वांशी मिळून मिसळून रहाणारी आणि सर्व जण
आनंदी रहावेत’, यांसाठी प्रयत्न करणारी कु. दक्षिता (वय ९ वर्षे) !
कु. दक्षिता (वय ९ वर्षे) ही बालसाधिका बालसंस्कार वर्गात नियमितपणे उपस्थित असते. त्यामुळे ती आणखी शांत आणि सुशील झाली आहे. ती निर्भय झाली आहे. ती सर्वांशी मिळून मिसळून रहाते. ती तिच्या भावाशी जुळवून घेते आणि कसलाही हट्ट करत नाही. ‘सर्व जण आनंदी रहावेत’, यांसाठी ती प्रयत्न करते. ती पाहुण्यांचे आदरातिथ्य चांगल्या प्रकारे करते.
– सौ. लक्ष्मी नायक, मदुराई, तामिळनाडू (१७.०२.२०२२)