रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

 

१. ‘आश्रमात असतांना मी जे अनुभवले, ते मला शब्दांत सांगता येत नाही. ती अनुभूती उत्कृष्ट आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रेरणादायी होती.’

– श्री. मानस सिंग रॉय, हावडा, बंगाल. (१३.२.२०२२)

२. ‘जनहितासाठी काम करणारे अनेक आहेत; पण जनहिताच्या समवेत राष्ट्रहित, सूक्ष्मातील अभ्यास, सनातन (हिंदु धर्माची) शक्ती आणि सद्गुरु परंपरा यांतून प्रगल्भ ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करण्याचे कार्य या आश्रमातून होत आहे.’

– सौ. स्नेहल नितीन जोशी (पत्रकार), मानेवाडा, नागपूर. (१३.२.२०२२)

३.अ. ‘आश्रम पुष्कळच चांगला आहे. ‘आश्रम म्हणजे एक मंदिरच आहे’, असे मला वाटले. आश्रम म्हणजे रामाचा दरबार आहे. येथे श्रीरामाचेच राज्य आहे.

३.आ. ‘प्रत्येक व्यक्तीने हा आश्रम पहाण्याचे पुण्यकर्म करून जन्माचे सार्थक करावे’, असे मला वाटते.

३.इ. मी आश्रम पाहिल्यावर मला साक्षात् स्वर्ग पाहिल्यासारखे वाटले.

३.ई. मला एकाने सुचवल्यानुसार मी येथील कार्य समजून घेण्यासाठी आलो होतो. मी एक क्षुद्र जीव आहे; पण येथे आल्यामुळे ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे मला वाटले. मी येथे सेवा करण्यासाठी निश्चितच पुन्हा येईन.’

– श्री. विनायक भट, मडगाव, गोवा.(५.३.२०२२)

४.अ. ‘रामनाथी आश्रमात आल्यावर मला पुष्कळ शांत वाटले.

४.आ. येथील सर्व साधक अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे सेवा करतात.

४.इ. गुरुदेव आठवलेजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांची शिकवण पाहून मी भारावून गेलो.’

– श्री. सिद्धार्थ गुप्ता, कोलकाता (१७.३.२०२२)

५. ‘आश्रम पहातांना मला अतिशय दिव्य आणि जगावेगळीच अनुभूती आली.’

– श्री. ए.व्ही. बागुर, बेंगळुरू, कर्नाटक. (१३.६.२०२२)

६.अ. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मला अत्यंत सुखद अनुभव आला.

६.आ. आपल्याद्वारे जे महान कार्य केले जात आहे, त्याची कितीही प्रशंसा केली, तरीही ती अल्पच आहे.’

– अधिवक्ता सुधीर गुप्ता, उत्तरप्रदेश. (४.९.२०२२)

७.अ. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मला साक्षात् भगवंताच्या द्वारका नगरीत आल्यासारखे वाटले. ‘श्रीकृष्णाला प्रत्यक्ष पाहिले’, असे मला जाणवले.

७.आ. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहिल्यावर नकारात्मक शक्ती सकारात्मक शक्तीला त्रास देतात आणि त्या दैवी कार्यात अडथळे आणतात. हे सर्व पाहून ‘आपल्या संतांनी किती सहन केले’, असे मला वाटले.’

– ह.भ.प. (सौ.) ऋतुजा जोशी, परभणी (२.१०.२०२२)

८.अ. आश्रम पाहून मला एक वेगळीच अनुभूती आली. दैवी शक्तीचा मानवी जीवनावरचा प्रभाव, तसेच मनाची सकारात्मक आणि नकारात्मक स्थिती यांविषयीची मला माहिती मिळाली.

८.आ. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहिल्यावर चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींचा मानवी जीवनावर होणारा परिणाम माझ्या लक्षात आला.

– श्री. वसंत ज. जोशी, नागपूर (१२.१०.२०२२)

 

Leave a Comment