वैद्य मेघराज पराडकर
‘कोणत्याही कारणाने भाजल्यास भाजलेल्या भागावर लगेच तूप लावावे. दाह तत्क्षणी थांबतो. वैद्य लोक पायांत होणार्या भोवर्या (कुरूप) जाळून काढण्यासाठी ‘अग्नीकर्म’ करतात. यामध्ये लोखंडी सळई तांबडी होईपर्यंत गरम करून तिच्या द्वारे भोवरी जाळली जाते. तापलेल्या लोखंडी सळईचे तापमान ७०० अंश सेल्सिअस असते. एक भोवरी काढण्यासाठी हा उपचार एकदाच करावा लागतो. या सळईचा जेव्हा चटका बसतो, तेव्हा वैद्य लोक त्या ठिकाणी लगेच तूप लावतात. एवढ्या गरम सळईने भाजलेले असले, तरी तूप लावल्यावर दुसर्या सेकंदाला दाह शांत झालेला असतो, एवढा तुपाचा प्रभाव आहे.’