वैद्य मेघराज पराडकर
‘कोणत्याही कारणाने (उदा. खरचटणे, कापणे यांमुळे) व्रण (जखम) झाला, तर त्यावर तुळशीचा रस लावावा. तुळशीचा रस लावल्याने व्रणामध्ये जंतूसंसर्ग होण्याची शक्यता न्यून होते आणि व्रण लवकर भरून येतो. तुळशीचा रस काढण्यापूर्वी दोन्ही हात साबण लावून स्वच्छ धुवावेत. तुळशीची ७ – ८ ताजी पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. त्यांतील पाणी झटकून टाकावे. ही पाने एकत्र करून दोन्ही तळहातांच्या मध्ये दाबत फिरवावीत. थोडा वेळ अशी फिरवल्यावर तळहाताला तुळशीचा रस लागू लागतो. तेव्हा पाने बोटांनी पिळून येणारा रस व्रणावर लावावा.’