अनुक्रमणिका
- १. गुणवैशिष्ट्ये
- २. शिकायला मिळालेली सूत्रे
- २ अ. अत्यल्प झोप होऊनही दिवस-रात्र साधकांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
- २ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यावर वाईट शक्तींनी आक्रमण केल्याने त्यांची कंबर आणि पाठ दुखणे, तरीही त्यांनी झोपलेल्या स्थितीतही साधकांना नामजपादी उपाय सांगणे
- २ इ. साधकांसाठी घंटोन्घंटे बसून नामजपादी उपाय करूनही स्वतःच्या शारीरिक त्रासाविषयी कोणतेही गार्हाणे न करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
- २ ई. पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजींसाठी नामजपादी उपाय करणे आणि तेव्हा ‘पोट चैतन्यामुळे भरले आहे’, असे सद्गुरु मुकुल गाडगीळ यांनी सांगणे
- २ उ. आपत्काळाच्या दृष्टीने आध्यात्मिक त्रासातून लवकर बरे होण्यासाठी सतत नामजपादी उपाय शोधणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
- २ ऊ. सूक्ष्मशरीर शास्त्राचा अचूक अभ्यास करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
- सूक्ष्म-स्तरावर प्रचंड कार्य करण्याची अद्वितीय क्षमता असणारे एकमेवाद्वितीय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ !
- ३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
- ३ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या जागी संपूर्णतः पांढरा शुभ्र गोळा दिसणे
- ३ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या जागी अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन होणे, तेव्हा त्यांनी स्वतःचे कार्य शिवासारखेच असल्याचे सांगणे
- ३ इ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या कपड्यांना सूक्ष्म आणि प्रत्यक्षही सुगंध येणे
- ३ ई. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या खोलीतील सेवा करतांना साधकाची पाठदुखी न्यून होणे
- ३ उ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडून प्रतिदिन केले जाणारे अग्निहोत्र कधी शरणागतभावात, कधी तारक किंवा मारक रूपात, कधी कृतज्ञताभावात, तर कधी शांतीच्या स्वरूपात केले जाणे
- ३ ऊ. प्रतिदिन पूजा केल्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा कृतज्ञताभाव जागृत होणे
- ४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या देहामध्ये झालेले पालट
- ५. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ निवास करत असलेल्या खोलीत झालेले पालट
- ६. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा संतांप्रती भाव
- ७. कृतज्ञता आणि प्रार्थना
- सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साधकांना आलेल्या अनुभूती आणि त्याचे उलगडलेले शास्त्र
‘फेब्रुवारी २०२१ पासून मला श्रीकृष्णकृपेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना प्रसाद-महाप्रसाद देण्याची आणि त्यांचे कपडे इस्त्री करण्याची सेवा मिळाली. याच समवेत मधल्या कालावधीत त्यांच्या खोलीची स्वच्छता करणे आणि अन्य काही सेवा करण्याचीही मला संधी मिळाली. माझ्या लक्षात आलेली सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
(सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ
१. गुणवैशिष्ट्ये
श्री. भूषण कुलकर्णी
१ अ. प्रेमभाव
‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना कधी कुणी काही खाऊ पाठवल्यास ते त्यातील थोडासा खाऊ मला आवर्जून देतात. कधी कधी ते मला आपणहून खाऊ खाण्यास बोलावतात.
१ आ. शिस्तबद्धता
सद्गुरु काकांच्या अनेक गोष्टींमध्ये शिस्तबद्धता असते. ते त्यांचे धुतलेले कपडे इस्त्री केल्याप्रमाणे घडी घालून ठेवतात. त्यामुळे ‘त्यांच्या कपड्यांना इस्त्री केली आहे’, असेच मला वाटते. त्यांच्या खोलीतील अनेक वस्तू जागच्या जागीच ठेवलेल्या असतात. त्यामुळे त्या वस्तू शोधण्यात वेळ जात नाही.
१ इ. चुकांविषयीची संवेदनशीलता
एका साधकाला आध्यात्मिक त्रासामुळे पोटात पुष्कळ दुखत होते. त्यामुळे त्याने पहाटे ४.३० वाजता सद्गुरु काकांना संदेश पाठवला. त्या वेळी सद्गुरु काका झोपलेले होते. सद्गुरु काका पहाटे ५.३० वाजता उठले आणि त्यांनी वैयक्तिक आवरले. सकाळी ६ वाजता त्या साधकाचा त्रास पुष्कळ वाढल्यामुळे त्याने सद्गुरु काकांना भ्रमणभाष केला. त्या वेळी सद्गुरु काकांनी त्यांना नामजपादी उपाय सांगितले आणि त्यांना १५ मिनिटांतच बरे वाटू लागले.
वरील प्रसंग मला सांगतांना सद्गुरु काका म्हणाले, ‘‘त्या साधकाला माझी तातडीने आवश्यकता असतांना मी त्याला साहाय्य करू शकलो नाही. ही माझी मोठी चूक झाली. मला गुरूंनी दिलेल्या दायित्वामध्ये मी न्यून पडलो.’’ हे सांगून झाल्यावर त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले. त्या वेळी त्यांच्यामध्ये असलेली चुकीविषयीची संवेदनशीलता आणि त्यांना जाणवलेली खंत माझ्या लक्षात आली.
१ ई. सद्गुरु काकांची खाण्याविषयी कोणतीही आवड-नावड नसणे
सद्गुरु काकांची खाण्याविषयी कोणतीही आवड-नावड नाही. त्यांना प्रसाद-महाप्रसादासाठी दिलेल्या पदार्थांमध्ये सर्व पदार्थ ते आवडीने खातात. ‘त्यांना एखादा पदार्थ आवडला; म्हणून त्यांनी तो पदार्थ पुष्कळ घेऊन खाल्ला’, असे नसते.
१ उ. आश्रमातील कार्यपद्धतीचे पालन करणे
सद्गुरु काकांना गोड आवडते. आश्रमात कधी गोड पदार्थ केल्यावर ‘तो पदार्थ किती घ्यावा ?’, याविषयीचे प्रमाण लिहिलेले असते. काही वेळा ते जेवलेले नसतात, तरीही सद्गुरु काका तो पदार्थ दिलेल्या प्रमाणानुसारच मला आणायला सांगतात.
२. शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. अत्यल्प झोप होऊनही दिवस-रात्र साधकांसाठी
आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
साधकांना आध्यात्मिक त्रास तीव्र स्वरूपात व्हायला लागल्यावर दिवसभरात किमान १०० साधक सद्गुरु गाडगीळकाकांना आध्यात्मिक स्तरावरील उपाय विचारतात. ‘कोणत्याही साधकाला आध्यात्मिक किंवा शारीरिक स्तरावरील त्रास असो, सद्गुरु काका त्या साधकांना ‘प्राणशक्तीवहन’ पद्धतीनुसार नामजप शोधून देतात, तसेच तो नामजप त्या साधकाने किती घंटे करायचा आणि कोणता न्यास करायला हवा’, तेही सांगतात. काही वेळा काही साधकांना शारीरिक त्रास होत असतो. त्या वेळी सद्गुरु काका स्वतः त्या साधकांसाठी घंटोन्घंटे नामजपादी उपाय करतात. साधकांसाठी सद्गुरु काका उपाय करतांना तहान-भूक हरपून जातात. दिवस असो वा रात्र असो, सद्गुरु काकांना काळाचे भान रहात नाही. काही वेळा सद्गुरु गाडगीळकाका रात्री १ वाजता झोपल्यानंतरही साधकांना आध्यात्मिक त्रास झाल्यावर ते साधक त्यांना भ्रमणभाषवर संपर्क करून कळवतात. त्यांना नामजपादी उपाय सांगणे किंवा प्रसंगी त्यांचा त्रास न्यून होईपर्यंत उपाययोजना करणे, यामुळे काही वेळा काकांना झोपायला पहाटे ४ ते ४.३० वाजतात, तरीही सकाळी ६.३० वाजता उठून त्यांचा नित्यक्रम चालू होतो.
२ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यावर
वाईट शक्तींनी आक्रमण केल्याने त्यांची कंबर आणि पाठ दुखणे,
तरीही त्यांनी झोपलेल्या स्थितीतही साधकांना नामजपादी उपाय सांगणे
मार्च २०२१ मध्ये सद्गुरु काकांवर वाईट शक्तींनी आक्रमण केल्याने त्यांची कंबर आणि पाठ पुष्कळ दुखत होती. त्या वेळी सद्गुरु काकांना बसतांना आणि वाकतांना पुष्कळ त्रास होत होता. त्या वेळी वैद्यांनी त्यांना ‘विश्रांती घ्यावी आणि अर्ध्या घंट्यापेक्षा अधिक वेळ बसू नये’, असे सांगितले होते. अशी स्थिती असतांनाही सद्गुरु काकांनी नित्यक्रमाप्रमाणे साधकांना नामजपादी उपाय सांगण्याची सेवा चालूच ठेवली. त्या वेळी त्यांनी स्वतःला बरे वाटत नाही; म्हणून सवलत घेतली नाही. त्याविषयी त्यांनी मला सांगितले, ‘‘आपल्याला श्री गुरूंनी साधकांचे दायित्व दिले आहे, तर आपण कुणालाही ‘नाही’ कसे म्हणायचे ? त्यांना नामजपादी उपाय सांगणे आणि त्यांच्यासाठी ते करणे, हे माझे कर्तव्य आहे.’’ यातून ‘सद्गुरु गाडगीळकाकांनी दायित्व कसे पार पाडले पाहिजे’, याचा परिपाठ मला घालून दिला.
२ इ. साधकांसाठी घंटोन्घंटे बसून नामजपादी उपाय करूनही
स्वतःच्या शारीरिक त्रासाविषयी कोणतेही गार्हाणे न करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
‘साधक किंवा संत यांच्यासाठी नामजपादी उपाय करतांना सद्गुरु काका बराच वेळ मुद्रा वा न्यास करून ध्यानाला बसतात, तर काही वेळा खोलीतल्या खोलीत फेर्या मारून हातात माळ घेऊन साधकांसाठी नामजप करतात. ‘आज पुष्कळ वेळ बसून नामजप केला; म्हणून पाठ किंवा कंबर दुखत आहे अथवा नामजपादी उपाय करतांना एकच न्यास पुष्कळ वेळ करावा लागला; म्हणून माझा हात दुखला’, असे गार्हाणे सद्गुरु काका कधीही करत नाहीत.
२ ई. पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजींसाठी नामजपादी उपाय करणे
आणि तेव्हा ‘पोट चैतन्यामुळे भरले आहे’, असे सद्गुरु मुकुल गाडगीळ यांनी सांगणे
एकदा पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजींचा औषधोपचार करूनही ताप न्यून होत नव्हता. सद्गुरु काकांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी पू. आजींसाठी सकाळी ८ वाजता नामजपादी उपाय चालू केले. मी सकाळी ८.१५ वाजता त्यांना अल्पाहार (न्याहरी) खोलीत नेऊन ठेवला होता. मी अल्पाहाराची रिकामी भांडी घेण्यासाठी सकाळी ९.१५ वाजता खोलीत गेलो असता सद्गुरु काकांनी अल्पाहार ग्रहण केलेला नव्हता. मी त्या वेळी सद्गुरु काकांना अल्पाहार आणि दूध गरम करून आणून देण्याविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘पू. आजींसाठी नामजपादी उपाय केल्यामुळे चैतन्याने माझे पोट भरले. अल्पाहार परत नेऊन ठेव. मला केवळ दूध गरम करून दे.’’
२ उ. आपत्काळाच्या दृष्टीने आध्यात्मिक त्रासातून लवकर
बरे होण्यासाठी सतत नामजपादी उपाय शोधणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
साधकांना तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना सद्गुरु काका नामजपादी उपाय शोधून देतात; पण ‘त्या साधकाला होत असलेला त्रास लवकरात लवकर न्यून होऊन त्याला बरे वाटावे’, यासाठी ते आध्यात्मिक स्तरावरील उपाय शोधून काढतात, उदा. साधकांची कुंडलिनीशक्ती जागृत करणे, अग्निहोत्राच्या माध्यमातून शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करणे, विविध शारीरिक आजारांवर देवतांचे नामजप सांगणे, संतांच्या कपड्यांवर सातत्याने वाईट शक्तींकडून आक्रमणे होत असतांना त्यावर आध्यात्मिक स्तरावर करावयाचे उपाय, साधकांवर आलेले त्रासदायक शक्तींचे आवरण लवकर दूर करण्यासाठी ‘निर्विचार’ नामजप भावपूर्ण ऐकणे आदी.
२ ऊ. सूक्ष्मशरीर शास्त्राचा अचूक अभ्यास करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
सद्गुरु काकांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अफाट आहे. ‘एखाद्या साधकाला कोणत्या प्रकारचा त्रास होत आहे आणि त्या साधकाला शरिरातील कोणत्या भागात त्रास होत आहे ?’, हे सद्गुरु काका अचूकपणे सांगतात. याविषयीची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
२ ऊ १. बालसाधिकेच्या दुखत असलेल्या भागावर नामजपादी उपाय केल्यावर तिला होणारा त्रास दूर होणे आणि बालसाधिकेच्या वैद्यकीय चाचण्याही सर्वसाधारण येणे : रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील एक बालसाधिका खेळत असतांना तोंडावर पडली. त्यामुळे तिला मुका मार लागला. तिला आधुनिक वैद्यांना दाखवले आणि सद्गुरु काकांना तिच्यासाठी नामजपादी उपायही विचारले. तेव्हा सद्गुरु काकांनी त्या बालसाधिकेच्या डोक्याच्या मागच्या बाजूस तळहात ठेवून न्यास करण्यास सांगून नामजपादी उपाय सांगितले. हे उपाय शोधत असतांनाच आधुनिक वैद्यांनी त्या बालसाधिकेला क्ष-किरण तपासणी करण्यास सांगितले. ‘खरेतर ती बालसाधिका चेहर्यावर पडलेली असतांना डोक्याच्या मागील बाजूस नामजप कसा येईल ?’, असा विचार कोणाच्याही मनात येऊ शकतो. त्या बालसाधिकेच्या आईने तिच्यासाठी न्यास करून नामजपादी उपाय केले. त्यानंतर १० मिनिटांनी त्या बालसाधिकेच्या मागील बाजूस टेंगूळ आले. त्या भागावर नामजपादी उपाय केल्यावर तिला होत असलेला त्रास दूर झाला आणि त्या बालसाधिकेच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवालही सर्वसाधारण (नॉर्मल) आले.
२ ऊ २. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर साधकाचे छातीत दुखण्याचा त्रास थांबणे : एका साधकाच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्या वेळी अन्य एका साधकाने त्याविषयी सद्गुरु काका यांना सांगितले. तेव्हा त्यांनी त्या साधकाचा हृदय स्पंदन आलेख (ई.सी.जी.) काढायला सांगितला. त्याच वेळी सद्गुरु काकांनी ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’तून नामजप शोधला. त्या वेळी सद्गुरु काकांनी साधकासाठी नामजपादी उपाय केल्यावर साधकाचा छातीत दुखायचा त्रास न्यून होऊन त्यााचा ‘ई.सी.जी.’चा अहवालही सर्वसाधारण आला.
२ ऊ ३. साधकांच्या त्रास निवारणासाठी त्यांच्या सूक्ष्म शरिराशी एकरूप होणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ ! : सद्गुरु काका त्रास होत असलेल्या साधकासाठी नामजपादी उपाय शोधतांना त्या साधकाच्या सूक्ष्म शरिराशी एकरूप होतात आणि त्या साधकाच्या त्रासाचे आध्यात्मिक स्तरावर अचूक निदान करतात. ते निदान करतांना त्या साधकाला जसा त्रास होत असतो, तशाच प्रकारचा त्रास सद्गुरु काकांना जाणवतो. त्यानुसार ते साधकाला नामजपादी उपाय सांगतात. हे उपाय सांगून झाल्यावर सद्गुरु काकांनी नामजपादी उपाय थांबवल्यावरही त्यांना मोठ्या प्रमाणात ढेकरा येण्याच्या माध्यमातून किंवा अन्य प्रकारे त्या साधकाचा आध्यात्मिक त्रास दूर होतो. याविषयी सद्गुरु काका म्हणाले, ‘‘मी जरी त्या साधकासाठी करत असलेले उपाय थांबवले असले, तरी माझ्या अंतर्मनात त्या साधकाचे नाव आणि आध्यात्मिक स्तरावरील उपायांचा विचार चालू असतो. त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात ढेकरा येतात वा अन्य प्रकारे त्या साधकातील त्रासदायक शक्तीचे विघटन होत असते.’’
सूक्ष्म-स्तरावर प्रचंड कार्य करण्याची
|
३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
३ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या जागी संपूर्णतः पांढरा शुभ्र गोळा दिसणे
‘एकदा सद्गुरु काकांनी संत आणि साधक यांच्यासाठी अनुमाने दीड घंटा नामजपादी उपाय केले. काकांचे नामजपादी उपाय झाल्यावर मला केवळ त्यांच्या शरिराची आकृती दिसत होती. मला त्यांच्या जागी संपूर्णपणे पांढरा शुभ्र गोळा दिसत होता आणि खोलीत थंडावा जाणवत होता.
३ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या जागी
अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन होणे, तेव्हा त्यांनी स्वतःचे कार्य शिवासारखेच असल्याचे सांगणे
एकदा सद्गुरु गाडगीळकाकांनी अन्य संत आणि साधक यांच्यासाठी वरीलप्रमाणेच नामजपादी उपाय केले. त्यानंतर त्यांचे अस्तित्व न जाणवता काही वेळ मला त्यांच्या जागी अमरनाथ येथील शिवलिंग दिसत होते. जणूकाही त्यांच्या माध्यमातून शिवच कार्य करत आहे.
वरील अनुभूती सद्गुरु काकांना सांगितली असता ते म्हणाले, ‘‘माझे कार्य भगवान शिवासारखेच आहे. शिव वाईट शक्तींचा लय करतो, तसेच माझे कार्य आहे.’’ त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘सद्गुरु काकांचे कार्य लय करण्याचे, म्हणजेच ‘साधकांचा त्रास लय करणे’, असे आहे. ते वाईट शक्तींच्या त्रासावर मात करण्यासाठी नवनवीन आध्यात्मिक स्तरावरील उपाय शोधून त्यावर संशोधनही करत असतात.’
३ इ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या कपड्यांना सूक्ष्म आणि प्रत्यक्षही सुगंध येणे
सद्गुरु काकांच्या कपड्यांना इस्त्री करत असतांना मला कधी मंद, मध्यम आणि तीव्र अशा स्वरूपाचे सूक्ष्म सुगंध, तर कधी प्रत्यक्ष सुगंध येतो. हा सूक्ष्म किंवा प्रत्यक्ष सुगंध १ ते दीड फुटापर्यंत जाणवतो. त्यांच्या नित्य वापरातील कपड्यांना मध्यम सूक्ष्म सुगंध, तर आध्यात्मिक प्रयोगासाठी वापरल्या जाणार्या कपड्यांना तीव्र सूक्ष्म सुगंध येतो. जे कपडे नवीन आहेत वा अल्प प्रमाणात वापरले जातात, त्यांना मंद सूक्ष्म सुगंध येतो. या सुगंधामुळेही साधकाना चैतन्य मिळून त्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.
३ ई. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या खोलीतील सेवा करतांना साधकाची पाठदुखी न्यून होणे
मला पाठ आणि कंबरदुखी यांचा तीव्र त्रास आहे. त्यामुळे मला वाकून सेवा करणे किंवा वजन उचलणे आदी सेवा करता येत नाहीत. मी १५ – २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभा राहिल्यास मला कंबरदुखी चालू होऊन तेथील भागात पुष्कळ वेदना होतात. गेल्या ६ मासांपासून मी सद्गुरु काकांच्या खोलीची स्वच्छता करत असतांना माझी पाठ आणि कंबरदुखी यांचा आध्यात्मिक त्रास ५० टक्के न्यून झाला आहे.
३ उ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडून प्रतिदिन
केले जाणारे अग्निहोत्र कधी शरणागतभावात, कधी तारक किंवा
मारक रूपात, कधी कृतज्ञताभावात, तर कधी शांतीच्या स्वरूपात केले जाणे
सद्गुरु गाडगीळकाका प्रतिदिन एक वेळ अग्निहोत्र करतात. हे अग्निहोत्र करत असतांना काही दिवसांपासून मला ‘ते करत असलेले अग्निहोत्र कधी शरणागतभावाने, तर कधी तारक किंवा मारक रूपात, कृतज्ञताभावात अथवा शांतीच्या स्वरूपात केले जाते’, असे जाणवले. ‘सद्गुरु काकांनी अग्निहोत्र करण्यापूर्वी ते आज कशा पद्धतीने करावे’, याविषयी काहीही ठरवलेले नसते; पण देवच त्यांच्याकडून वरीलपैकी एका पद्धतीने आणि समष्टीला कोणत्या स्वरूपात ते होणे अपेक्षित आहे, तसे होत असते’, असे मला वाटते.
३ ऊ. प्रतिदिन पूजा केल्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा कृतज्ञताभाव जागृत होणे
सद्गुरु काका सकाळी स्नानानंतर त्यांच्या खोलीत असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राची पूजा करतात. ही पूजा केल्यानंतर सद्गुरु काका भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांना कृतज्ञतापूर्वक आणि शरणागतभावाने प्रार्थना करतात. सद्गुरु काका करत असलेली ही प्रार्थना इतकी भावपूर्ण असते की, प्रार्थना पूर्ण झाल्यावर त्यांचे डोळे प्रतिदिन पाणावलेले असतात, तर कधी प्रार्थना करत असतांनाच डोळ्यांतून भावाश्रूचा एक थेंब चेहर्यावर ओघळतो. याविषयीही सद्गुरु काका एकदा म्हणाले, ‘‘मला दिलेली ही सेवा मी त्यांच्यामुळेच (भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे) करू शकत आहे. माझी तशी क्षमता नाही. तेच माझ्याकडून साधकांना नामजप शोधून देणे आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून घेतात.’’
४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या देहामध्ये झालेले पालट
अ. सद्गुरु गाडगीळकाकांच्या त्वचेचा स्पर्श लोण्यासारखा मऊ झाला आहे.
आ. त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याचा आकार उजव्या सोंडेच्या गणपतीसारखा झाला आहे.
इ. बर्याच वेळा त्यांचा चेहरा गुलाबी दिसतो, तर काही वेळा एकदम तेजयुक्त पांढरा शुभ्र दिसतो. काही वेळा त्यांचा चेहरा लहान मुलासारखा गोंडस दिसतो. ते मारक स्वरूपात नामजप करतात, त्या वेळी त्यांचा चेहरा आणि शरिराचा काही भाग लालबुंद होतो.
ई. त्यांच्या देहाभोवती ४ फुटापर्यंत सूक्ष्म सुगंध दरवळत असतो.
५. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ निवास करत असलेल्या खोलीत झालेले पालट
अ. खोलीतील कोटा फरशी गुळगुळीत झाली आहे, तसेच फरशीवर व्यक्तीचे प्रतिबिंब उमटते.
आ. सद्गुरु काकांची खोली काही वेळा खोल निर्गुण पोकळी जाणवते.
इ. सद्गुरु काकांनी कुणी संत आणि साधक यांच्यावर मारक स्वरूपात नामजपादी उपाय केल्यावर त्यांची खोली पुष्कळ प्रकाशमान झालेली दिसते.
ई. सद्गुरु काकांच्या खोलीत आवश्यकतेनुसार तारक-मारक स्वरूपातील मंद, मध्यम किंवा तीव्र सूक्ष्म सुगंध येतो. हा सूक्ष्म सुगंध दिवसभर कार्यानुमेय वरील तिन्ही प्रकारे न्यून-अधिक प्रमाणात येतो. काही वेळा सद्गुरु काकांच्या खोलीतील सुगंध खोलीच्या बाहेर ३ मीटरपर्यंत येतो.
६. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा संतांप्रती भाव
अ. जुलै २०२१ मध्ये सद्गुरु काका सनातनच्या ४८ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींची भेट घेणार होते. पू. आजी खोलीत येण्यापूर्वी ५ मिनिटे सद्गुरु काका
खोलीत आले. सद्गुरु काकांनी खोलीची स्वच्छता आणि बसण्याची व्यवस्था बघितली. त्यानंतर त्यांनी खोलीत उदबत्ती लावण्यास सांगितली. त्याच वेळी खोलीत असलेल्या एका लाकडी दिवाणावरील गादीची चुरगळलेली खोळ त्यांनी व्यवस्थित केली. पू. दातेआजी खोलीत आल्यावर सद्गुरु काकांनी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला.
आ. एकदा सद्गुरु काकांच्या खोलीत पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज भेटायला येणार होते. त्या वेळी सद्गुरु काकांनी ते येण्याअगोदर मला बोलावून घेतले आणि पुन्हा खोलीचा केर काढण्यास अन् जमीन पुसण्यास सांगितली.
इ. एप्रिल २०२१ मध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ येणार होत्या. त्या वेळीही सद्गुरु काकांनी संपूर्ण खोलीची स्वच्छता करून घेतली. एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ येणार; म्हणून त्यांनी खोलीतील दिवाणावर नवीन चादर (बेडशीट) घातली.
ई. मे २०२१ मध्ये सद्गुरु राजेंद्र शिंदे हे सद्गुरु गाडगीळकाकांना भेटण्यास त्यांच्या खोलीत येणार होते. त्या वेळीही सद्गुरु गाडगीळकाकांनी खोली स्वच्छता करून घेण्यासह सद्गुरु राजेंद्रदादांच्या बसण्याची व्यवस्था केली.
७. कृतज्ञता आणि प्रार्थना
सद्गुरु काकांची सेवा करण्याची संधी परात्पर गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळेच मिळाली. सद्गुरु गाडगीळकाका यांचे समष्टी आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयीचे सूक्ष्मातील कार्य अद्वितीय अन् अफाट आहे. या लेखात त्यांच्याविषयी लिहिलेला भाग म्हणजे काही अंशांश असून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामुळे मी तो मांडण्याचा करू शकलो. त्यांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता शब्दांत मांडण्यासाठी लेखणी थिटी (अपुरी) आहे. आज माझ्यासह सनातनच्या सर्व साधकांना उगवणारा प्रत्येक दिवस परात्पर गुरु डॉ. आठवले, भगवान श्रीकृष्ण, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्यामुळेच दिसत आहे. त्यामुळे या सर्वांच्या कृपेविषयी एका वाक्यात सांगायचे झाल्यास ‘तुझ्या कृपेने दिवस उगवे हा !’, अशी माझी स्थिती आहे.
‘परात्पर गुरुदेव, भगवान श्रीकृष्ण, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्या कृपेमुळेच ईश्वरप्राप्तीची आंतरिक ओढ आणि गोडी उत्तरोत्तर वाढत असून ती लवकरात लवकर साध्य करावी’, असे अंतरी वाटत आहे. ‘सद्गुरु काकांचे गुण आत्मसात करण्यासह त्यांच्या समष्टी कार्यात आपणही साधना वाढवून त्यांच्याशी लवकरात लवकर एकरूपता साधली जावी’, अशी त्यांच्याच चरणी प्रार्थना !’
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(१.९.२०२१)
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या
|
वाईट शक्ती
वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. आध्यात्मिक त्रास याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. सूक्ष्म व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |