वैद्य मेघराज पराडकर
‘पूर्वग्रह, राग, भीती यांसारख्या मूलभूत स्वभावदोषांमुळे बर्याच जणांना मोकळेपणाने बोलता येत नाही. काहींच्या मनामध्ये वर्षानुवर्षे पूर्वीचे प्रसंग आणि त्यांसंबंधीच्या भावना साठून राहिलेल्या असतात. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार साठून राहिले की, त्याचे पडसाद शरिरावर उमटतात आणि निरनिराळे शारीरिक त्रास चालू होतात. मनमोकळेपणाने बोलल्याने मनात साचून राहिलेल्या भावनांना वाट मिळते आणि मन हलके होते. मनावरील ताण न्यून होतो आणि तोंडवळाही आनंदी दिसतो. त्यामुळे मनमोकळेपणाने बोलणे, हे एक मोठे औषध आहे.’