नियमित व्यायाम कराच !
‘नियमित व्यायाम केल्याने शारीरिक क्षमता वाढते. त्यासह मनाचीही क्षमता वाढते. नियमित व्यायाम करणार्याचे मन ताणतणाव सहन करण्यास सक्षम होते. व्यायाम करणार्याला वातावरणातील किंवा आहारातील पालट सहसा बाधत नाहीत. व्यायाम करून शरीर सुदृढ ठेवल्यास साथीच्या रोगांचाही प्रतिकार करण्यास साहाय्य होते. व्यायाम करण्यासाठी कोणताही व्यय (खर्च) येत नाही. रोगनिवारणाचा असा विनामूल्य उपचार प्रत्येकाला करणे सहज शक्य असतांना केवळ ‘आळस’ या एका स्वभावदोषामुळे तो नियमित केला जात नाही. चला ! आजपासून नियमित व्यायाम करूया !’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२२)
शरीर निरोगी राखण्यासाठी केवळ एवढेच करा !
‘केवळ ‘प्रतिदिन नेमाने व्यायाम करणे’ आणि ‘दिवसातून २ वेळाच आहार घेणे’ या दोनच गोष्टी नित्य आचरणात ठेवल्या, तर शरीर निरोगी रहाते. दुसरे काहीही करण्याची आवश्यकता रहात नाही, एवढे या २ कृतींना महत्त्व आहे.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०२२)