‘झाडांच्या वाढीसाठी आवश्यक ती खनिज द्रव्ये मातीमध्ये असतातच; परंतु झाडांची मुळे ती द्रव्ये थेट ग्रहण करू शकत नाहीत. मातीतील खनिज द्रव्ये झाडांच्या मुळांद्वारे शोषली जाण्यासाठी झाडांसाठी उपयुक्त अशा सूक्ष्म जिवाणूंची आवश्यकता असते. देशी गायीच्या केवळ १ ग्रॅम शेणामध्ये ३०० कोटींहून जास्त प्रमाणात उपयुक्त सूक्ष्म जीवाणू असतात. अगदी थोड्या प्रमाणात देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्या साहाय्याने ‘जीवामृत’ नावाचे नैसर्गिक खत बनते. यामध्ये या जिवाणूंची संख्या पुष्कळ जास्त असते. मातीमध्ये जीवाणू जेवढे जास्त, तेवढी झाडाची मातीतील खनिज द्रव्ये ग्रहण करण्याची क्षमता जास्त असते. यामुळे झाडापासून उत्पन्नही जास्त मिळते. अन्य कोणतीही खते न वापरता केवळ जिवामृताचा वापर करून घरच्या घरी भाजीपाला पिकवता येतो. हे पुष्कळ सोपे आणि अल्प खर्चाचे आहे. सर्वांनीच नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला लागवड करायला हवी.’ – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.७.२०२२)
जिवामृतातील विविध घटकांचे प्रमाण आणि अन्य माहिती यांसाठी भेट द्या. मार्गिका : https://www.sanatan.org/mr/a/83659.html