वेद आणि हिंदु संस्कृती यांसंदर्भात आपली भूमिका
अतिशय प्रखरपणे मांडणारी सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे !
वेदोऽखिलं धर्ममूलम् । म्हणजे वेद हे अखिल धर्माचे मूळ आहे. या वर्षी सनातन पाठशाळेचा सहावा वर्धापनदिन साजरा होत आहे, ही आम्हा वेदप्रेमींसाठी आणि गोमांतकियांसाठी सार्थ अभिमानाचीच गोष्ट आहे. वेद आणि हिंदु संस्कृती यांसंदर्भात आपली भूमिका अतिशय प्रखरपणे मांडणारी सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे. संस्था सर्व बाजूंनी धर्मरक्षणाचे कार्य करतच आहे. यात विशेष असे की, ही संस्था गेली ६ वर्षांपासून अव्याहतपणे वेदरक्षण करत आहे. आचार आणि विचार यांसमवेत वेद कंठस्थ रहाण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाठांतर स्पर्धांचे आयोजन अन् विविध ठिकाणी होणार्या परीक्षांमध्ये भाग घेणे आवश्यक आहे. यामुळे संस्थेचे कार्य समाजापर्यंत पोहोचेल आणि संस्थेचे उत्तरोत्तर कार्य वृद्धिंगत होईल. वेदकार्यासाठी पुष्कळ शुभेच्छा. पाठशाळेची अशीच उत्तरोत्तर वृद्धी होवो, ही वेदपुरुषाच्या चरणी प्र्रार्थना. शुभं भवतु । – घनपाठी श्री. योगेश्वर बोरकर गुरुजी, गोवा
सनातन साधक-पुरोहित पाठशाळेत खर्या अर्थाने निःस्वार्थी पुरोहित सिद्ध होत आहेत !
सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय कल्याणाच्या दृष्टीने सिद्ध होत आहेत. पारंपारिक पद्धतीने चालणार्या वेदपाठशाळांमधून अभावानेच असे संस्कार होतात. आध्यात्मिक साधना, स्वतःमधील दोष घालवून चांगले गुण बाणवण्याची तळमळ, सेवाभाव, शिस्त, गुर्वाज्ञापालन, आपुलकीचे वर्तन, श्रद्धा, नम्रता आदी दुर्मिळ गुण या विद्यार्थ्यांमध्ये बाणवले जातात. संस्थेच्या पाठशाळेत खर्या अर्थाने निःस्वार्थी पुरोहित सिद्ध होत आहेत. याचे फार समाधान वाटते. पाठशाळा उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊन सहस्रो निष्ठावान पुरोहित वेदाभ्यासी विद्यार्थी समाज, हिंदु संस्कृती आणि हिंदु राष्ट्र यांच्या निर्माणासाठी सिद्ध व्हावेत, हीच सदिच्छा ! – आहिताग्नी सोमयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी, बार्शी, जि. सोलापूर.
ज्ञानदानामुळे होणार्या प्रबोधनाचे अन् अज्ञान दूर करण्याचे
कार्य स्वप्रकाशाने झळकणार्या सूर्याप्रमाणे उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो !
सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील साधक-विद्यार्थी आणि पाठशाळा यांचे ज्ञानदानामुळे होणार्या प्रबोधनाचे अन् अज्ञान दूर करण्याचे कार्य स्वप्रकाशाने झळकणार्या सूर्याप्रमाणे उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो, ही भगवत् चरणी प्रार्थना !
– वेदमूर्ती कालिदास सावईकर गुरुजी, कवळे, फोंडा, गोवा.