बेंगळुरू – भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, या भूमिकेतून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या आर्. टी. नगर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना राखी बांधण्यात आली. सनातनच्या साधिका सौ. वनजा यांनी त्यांना राखी बांधली. या वेळी साधिका सौ. सुधा सदानंद याही उपस्थित होत्या. त्यावेळी बोम्माई यांना सनातन निर्मित सात्त्विक उत्पादने असलेला वैशिष्ट्यपूर्ण भेटसंच (गिफ्ट बॉक्स) भेट देण्यात आला. राखी बांधल्यानंतर ‘साधिकेचे आणि सनातन संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे कल्याण होऊ दे’, अशा शुभेच्छा बोम्माई यांनी दिल्या.
On behalf of Sanatan Sanstha, #Rakhi was tied to @BSBommai Honorable Chief Minister of Karnataka !
Sanatan Sanstha
Teaching Spirituality comprehensively
Visit @ https://t.co/ctQR1gqRc5 pic.twitter.com/KHf162i2Za— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) August 12, 2022
कर्नाटकचे गृहमंत्री श्री. अरागा ज्ञानेंद्र यांना देखील रक्षाबंधन निमित्त सनातन संस्थेच्या वतीने राखी बांधण्यात आली.
On behalf of Sanatan Sanstha, #Rakhi was tied to @JnanendraAraga Honorable Home Minister Of Karnataka!
Sanatan Sanstha
Teaching Spirituality comprehensively
Visit us @ https://t.co/ctQR1gqRc5 pic.twitter.com/erUMTxYMuU— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) August 12, 2022