रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

१. आश्रमात मला पुष्कळ चांगले वाटले. येथील व्यवस्थापन आणि कार्य अतिशय शिस्तबद्ध आहे.

– श्री. तुलसीदास मंगेशकर, कांदोळी, गोवा.

२. सकारात्मक आभा आणि स्थूल डोळ्यांना न दिसणारे दैवी ऊर्जेचे अस्तित्व असलेला रामनाथी आश्रम !

अ. आश्रम अतिशय स्वच्छ आणि अप्रतिम आहे. येथील कार्यपद्धती चांगल्या आहेत. येथील साधक शिस्तप्रिय आणि सात्त्विक आहेत.

आ. येथे सर्वत्र सकारात्मक आभा दिसून येते. ‘येथे स्थूल डोळ्यांना न दिसणारे दैवी ऊर्जेचे अस्तित्व आहे’, हे मला समजले.

इ. हा आश्रम पहाण्यासाठी अधिकाधिक लोकांनी यावे, जेणेकरून त्यांना एवढ्या सुंदर ठिकाणाची माहिती मिळेल.

– पूजा मंगेशकर, गोवा.

३. ‘आश्रम अतिशय स्वच्छ आणि सुनियोजित असून वाखाणण्याजोगा आहे. आश्रम सकारात्मक ऊर्जेने (चैतन्याने) भरलेला आहे.’

– अधिवक्त्या (सौ.) स्वराग्नी मूर्ती, बेंगळुरू, कर्नाटक. (१२.६.२०२२)

४. ‘आश्रम पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. मी आश्रमाच्या सर्वांगीण यशाची इच्छा करतो.’

– श्री. नोनी गोपाल पतरी (संस्थापक, हिंदु सहायता समिती), दुर्गापूर, बंगाल. (१३.६.२०२२)

५. ‘आश्रमातील वातावरणात पावित्र्य असल्याची मला जाणीव झाली. आश्रमात आल्यावर माझ्या मनाची प्रसन्नता वाढली.’

– श्री. व्यंकटेश यशवंतराव शिंदे (हमारा देश, कोर कमिटी मेंबर), बेळगाव, कर्नाटक. (१६.६.२०२२)

६. ‘आश्रम पाहून माझे मन शांत झाले. येथे मला पुष्कळ ज्ञान मिळाले. त्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील.’

– श्री. परशुराम नामदेव गावडे (अध्यक्ष, श्री कमलेश्वर शिक्षक प्रसारक संस्था), पेडणे, गोवा. (१६.६.२०२२)

७. ‘आश्रमामध्ये मला सात्त्विकता जाणवली. येथे आल्यावर देवाप्रती प्रेम आणि भाव वाढल्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली.’

– अधिवक्ता प्रमोद हेदे, मडगाव, गोवा. (१६.६.२०२२)

८. ‘आश्रमात आल्यानंतर ‘आपण देवभूमीत आणि देवलोकात आलो आहोत’, असे मला वाटत होते.’

– श्री. सुरेश भाऊसो यादव (उपसरपंच, शिवसेना), शिरोली, जिल्हा कोल्हापूर. (१६.६.२०२२)

 

 

Leave a Comment