देवतेच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. ‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ कलियुगात नामजप हीच साधना आहे. नामाचा संस्कार मनावर रूजेपर्यंत तो मोठ्याने म्हणून करणे लाभकारी आहे. भगवंताच्या नामाबरोबरच त्याचे रूप, रस, गंध आणि त्याची शक्तीही असतेच. भगवंताच्या नामाचे उच्चारण करतांना तसेच ते नाम ऐकतांना हे लक्षात घ्यायला हवे.
देवतेबद्दल भक्तिभाव निर्माण झाल्यानंतर देवतेचे नाम कसेही घेतले तरी चालते; पण भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे.
देवतेची तारक आणि मारक अशी दोन रूपे असतात. भक्ताला आशीर्वाद देणारे रूप म्हणजे तारक रूप, उदा. नेहमी आढळणारा आशीर्वाद मुद्रेतील शिव. असुरांचा संहार करणारे रूप म्हणजे मारक रूप, उदा. अनिष्ट शक्तींचा नाश करणारा शिव. देवतेप्रति सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो, तर देवतेकडून शक्ती आणि चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.
शिवाचा तारक-मारक संयुक्त नामजप योग्य उच्चारासह कसा करावा, हे सांगितले आहे. ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नमः’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा. या वेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा. ‘नम:’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर ‘शिवाय’ हा शब्द म्हणावा. नामजपात मारक भाव येण्यासाठी ‘शिवाय’ या शब्दातील ‘शि’ या अक्षरावर जोर द्यावा.
खूपच छान माहिती आहे..
evdha khol vichar karun kadhich namjap nvta kela ,aata samjle